आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लक्ष्मी -विष्णू’ची चिमणी पाडण्यास मनाई करण्याचा महापालिकेचा अर्ज फेटाळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लक्ष्मी-विष्णूगिरणीची चिमणी पाडण्यास मनाई करण्याचा महापालिकेचा अर्ज दिवाणी न्यायाधीश एस. एस. पानसरे यांनी बुधवारी फेटाळला. मात्र, अपिलास मुदत देत ‘जैसे थे’चा आदेश दिला.
महापालिकेने मे २०१५ रोजी “प्राचीन वास्तू आणि पुरातात्विक स्थल अवशेष कायदा १९५८ अंतर्गत कलम ३० आणि प्राचीन वास्तू आणि जतन कायदा १९०४ अंतर्गत कलम १६ नुसार’ गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी इंद्रधनुच्या संचालकाकडून अॅड. आय. बी. पाटील, अॅड. अतुल कस्तुरे, महापालिकेकडून अॅड. रघुनाथ दामले यांनी काम पाहिले.

मागीलघडामोडी अशा
मागीलवर्षी मेच्या सुुरुवातीपासून ‘इंद्रधनू’ प्रकल्पाच्या संचालकांनी चिमणीचे पाडकाम सुरू केले होते. मे २०१५ रोजी दुपारी आमदार प्रणिती शिंदे यांनी हस्तक्षेप केल्याने पाडकाम तात्पुरते थांबले होते. चिमणी ऐतिहासिक नाही ती जीर्ण झाल्यामुळे पाडणे गरजेचे असल्याची भूमिका संचालकांनी घेतली होती.

इंद्रधनु गृहप्रकल्पाचे काम चिमणीला धक्का लावता सुरू होते. मात्र अचानक चिमणी पाडणे सुरू करण्यात आले. चिमणी ही गिरणी गावची ओळख आहे, तिचे जतन व्हायला हवे. तज्ज्ञांकडून चिमणीची पाहणी होत नाही तोपर्यंत पाडकाम थांबवावे, अशा सूचना आमदार प्रणिती शिंदे यांनी दिल्या होत्या. यानंतर आमदार शिंदे यांच्यासोबत बैठक झाली होती. परंतु त्यातून तोडगा निघाला नाही. चिमणी ऐतिहासिक आहे आणि संबंिधतांची परवानगी घेता चिमणीचे पाडकाम सुरू आहे. ते पाडकाम त्वरित थांबवावे, अन्यथा फौजदारी दाखल करावी लागेल, असे सांगत महापालिकेने इंद्रधनुच्या संचालकांना नोटीस दिली होती. सर्व घडामोडी मे रोजी एका दिवसातच झाल्या होत्या. यानंतर मे रोजी हा विरोध डावलून चिमणीचे पाडकाम सुरूच होते.

आता तरी हेरिटेज कमिटी हवी
महापालिकेनेआतातरी हेरिटेज कमिटी स्थापन करावी. तसेच या चिमणीसंदर्भात पुढील न्यायालयात दाद मागावी आणि त्या चिमणीचे आहे त्या परिस्थिती जतन करावे.”
सिमंतिनी चाफळकर, इंटॅक, समन्वयक

दिवााणी न्यायालयातमहापालिकेचा अर्ज फेटाळला अाहे. त्यावर जिल्हा न्यायालयात अपिल करण्यात येईल. त्यासाठी अर्ज देऊन मुदत मागितली. अपिलासाठी ३० दिवसांची मुदत असते, तोपर्यंत चिमणी पाडकाम करण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे.” अरुणसोनटक्के, मनपा विधान सल्लागार

पुरातन वास्तूंचे नाही गांभीर्य
इंद्रभुवनइमारत, मिलचे चिमणी, जुने वाडे, शिवकालीन इमारत, मंदिर, मिलची इमारत, लक्ष्मी मार्केट इमारत आदी पुरातन इमारती असून, त्याचे जतन करण्यासाठी महापालिका अंदजपत्रकात विशेष तरतूद नाही. या वास्तु दीर्घकाळ टिकाव्यात यासाठी प्रयत्न नाहीत. चिमणीसह अन्य इमारतींचे पुरातन वास्तूमध्ये समावेश करण्यासाठी महापालिका पातळीवर प्रयत्न केले नाहीत.

असे उत्तर, अशी परिस्थिती
याप्रकरणीमे रोजी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले होते की, वारसा समितीसाठी सदस्यांची यादी आणि इमारतीची प्रारूप यादी राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवली आहे. या यादीत या चिमणीचा समावेश आहे. याला तीन वर्षे झाली आहेत. त्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. हे सांगून दीड वर्ष उलटले तरी अद्याप परिस्थिती जैसे थे अशीच आहे.

अशा होत्या तांत्रिक अडचणी
एका बाजूने महापालिकेने अद्याप हेरिटेज कमिटी स्थापन केली नाही. तसेच वास्तूंना ऐतिहासिक जाहीर करण्याचा अधिकार हेरिटेज कमिटीचा असतो. कमिटीच नाही तर त्या वास्तूला ऐतिहासिक कोण म्हणणार असा मुद्दा उपस्थित होतो. हेरिटेज कमिटीमध्ये कोण कोण सदस्य हवे याची नियमावली शासनाने निश्चित केली आहे. असे असताना महापालिकेने अद्याप हेरिटेज कमिटी का स्थापन केली नाही.

चिमणीची माहिती
चिमणी सुमारे १०० वर्षांपेक्षा जुनी, उंची २४० फूट, गोलाई रुंदी ३० फूट, याचे बांधकाम लोड बेरिंग पद्धतीचे, बाहेरून दगडी तर आतून विटांचे बांधकाम. २४० पैकी फक्त ८४ फूट शिल्लक.
बातम्या आणखी आहेत...