आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरपद चाचपणीसाठी बैठक, पण निर्णयासाठी भाजप काँग्रेसच्याच वाटेने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिकेत भक्कम बळ असल्याने महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षातील इच्छुक महिला नगरसेविकांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे नाव निश्चित करण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत शनिवारी बैठक घेतली. निवडून आलेल्या नगरसेवकांनी महापौर निवडण्याऐवजी भाजपनेही काँग्रेसच्याच वाटेने जात नेत्यांवर निर्णय सोपवल्याचे दिसून आले. शोभा बनशेट्टी, श्रीकांचना यन्नम शशिकला बत्तुल यांच्यात स्पर्धा दिसते अाहे.
 
रविवारीच नाव जाहीर होणार अाहे. दरम्यान, काँग्रेसने महापौरपदाचा उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट करत गटनेतेपदी चेतन नरोटे यांची निवड केली. इच्छुकांची मते जाणून घेण्यासाठी पक्षाचे निरीक्षक संभाजीराव निलंगेकर शनिवारी सोलापुरात आले होते. 
 
शिवसेनेला अादेशाची प्रतीक्षा 
भाजपने मुंबईत सेनेचा मार्ग मोकळा केला अाहे. त्यामुळे सोलापुरात सेना सत्तेत सहभागी होणार का? याची उत्सुकता अाहे. २१ सदस्य असलेल्या सेनेची भूमिका रविवारी स्पष्ट होणार आहे. पक्षाचे निरीक्षक खासदार राहुल शेवाळे रविवारी सोलापुरात येत आहेत. 
 
काँग्रेस गटनेतेपदी चेतन नरोटे 
महापौर, उपमहापौरसाठी उमेदवार देण्याचा निर्णय रविवारीच ठरेल असे आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या. दरम्यान, काँग्रेस गटनेतेपदी नगरसेवक चेतन नरोटे यांची निवड झाली. 
 
१५ मिनिटांनी आले पालकमंत्री देशमुख 
भाजप नगरसेवकांची चारची बैठक ५.३० वाजता सुरू झाली. तीही अर्धा तासात संपली. सुरुवातीस पालकमंत्री देशमुख समर्थक नगरसेवक गैरहजर होते. तरीही चर्चा सुरू झाली. १५ मिनिटांनी पालकमंत्री आले, पण त्याचे चिरंजीव नगरसेवक किरण देशमुख गैरहजर होते. 
 
निलंगेकर पोहोचले नेत्यांच्या घरी 
पक्षाच्या नूतन नगरसेवकांच्या बैठकीपूर्वी निलंगेकर यांनी खासदार बनसोडे, पालकमंत्री सहकारमंत्री यांची वैयक्तिक भेट घेऊन चर्चा केली. निवडणुकीत जबाबदारी काय होती, किती नगरसेवक निवडून आले. आपली भूमिका काय? आदी मुद्यांवर चर्चा केली. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...