आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धवट काम करणाऱ्या एजन्सीलाच पुन्हा संधी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राजीव आवास योजनेचे काम अपूर्ण करून कोटी घेणाऱ्या एनव्हायरो कंपनीला आता पंतप्रधान आवास योजनेचे काम देण्यात आले. शनिवारी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत हा निर्णय झाला. काही नगरसेवकांनी या निर्णयाला आक्षेप घेतला. नंतर मंजुरीही दिली.

सर्वांना घर देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘पंतप्रधान आवास योजना’ शहरात राबवण्यासाठी शासनाकडे ‘डीपीआर’ (सविस्तर प्रकल्प अहवाल) पाठवायचे आहे. त्याचे काम खासगी कन्सल्टन्सीकडून घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायीकडे पाठवला. एनव्हायरो कन्सल्टन्सी या कंपनीचे नावही पुढे केले. स्थायी समिती सदस्य आणि बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासह काहींनी या नावाला आक्षेप घेतला. राजीव आवास योजनेचे काम याच कंपनीला दिले होते. त्या वेळी कोटी रुपये मानधनही त्याला अदा केले. पण काम मात्र अर्धवटच राहिले. अशाही स्थितीत त्याच कंपनीला पुन्हा काम देणे योग्य होणार नाही, अशी मते त्यांनी मांडली. पण नवीन अहवालदेखील मागील कामाचाच एक भाग आहे. त्यामुळे अहवाल लवकर होईल, असे त्यांच्या आक्षेपांचे खंडन करण्यात अाले. शेवटी त्याच मक्तेदाराला काम देण्यास मंजुरी मिळाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती रियाज हुंडेकरी होते.

खासगी बागेत सुधारणेचा प्रस्ताव परत पाठवला
प्रभागक्रमांक ११ मधील माटे बागेत सुधारणा करण्याचा िवषयही स्थायीच्या सभेपुढे आला. नगरसेविका शशिकला बत्तुल यांनी त्याला विरोध केला. ही बाग खासगी आहे. त्यावर एकाची मालकी आहे. त्याचे महापालिकेकडे रीतसर हस्तांतरण झालेले नाही. अशा स्थितीत या बागेत सुधारणा कसे करता? त्यांचा आक्षेप ग्राह्य धरून हा प्रस्ताव परत पाठवण्यात आला. त्याचे फेरसादरीकरण करण्याचे मतही नोंदवण्यात आले. सत्यशीलनगरात स्वच्छतागृह, दमाणी नगरात उद्यान बंदिस्त करणे या विषयांना मंजुरी देण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...