आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विनानोंद मिळकत शोध काम वेळेत पूर्ण नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील नोंद नसलेल्या मिळकतींचा शोध घेण्यासाठी महापालिकेने सायबर टेक कंपनीला २२ आॅगस्ट २०१४ मध्ये मक्ता दिला. आॅगस्ट २०१५ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु ते झाले नाही. त्यामुळे कंपनीवर कारवाई करण्याऐवजी त्यांना वारंवार मुदतवाढ महापालिकेने दिली. तरीही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे संबंधित कंपनीवर महापालिकेने त्वरित कारवाई करून त्यांना काळ्या यादीत घालावे, अशी मागणी महापालिका सभागृह नेते संजय हेमगड्डी आणि नगरसेवक अॅड. यू. एन. बेरिया यांनी केली. संबंधित अधिकारी सचिन कांबळे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत महापालिका आयुक्तांना सभागृहात जाब विचारू असे अॅड. बेरिया म्हणाले. सर्व्हेचे काम ९० टक्के पूर्ण झाले अाहे. सुमारे २५ हजार मिळकती मिळून आल्या. यात वाढ होईल, अशी माहिती संगणक विभाग प्रमुख सचिन कांबळे दिली.
शहरातील मिळकतीचे शोध घेण्यासाठी ५.२० कोटींचा मक्ता देण्यात आला. त्यांनी आॅगस्ट २०१५ पर्यंत काम पूर्ण करणे अपेक्षित असताना केले नाही. सुमारे एक लाख मिळकती मिळून येतील. त्यामुळे महापालिकेला १०० कोटी उत्पन्न मिळेल असे सांगण्यात आले. त्यानुसार महापालिका अंदाजपत्रकात ५० कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले. ३० पेठांचा सर्व्हे पूर्ण झाला. यातून दहा कोटी उत्पन्न मिळेल, असे सहायक आयुक्त अभिजित हरळे यांनी स्पष्ट केल्याने अॅड. बेरिया यांनी आक्षेप घेतला. ५.२० कोटी मक्ता आणि त्यावर देखरेख करणारी मनपा यंत्रणा खर्च पाहता दहा काेटींचे वाढीव उत्पन्न येत असेल तर सर्व्हे सशंयास्पद असल्याचे अॅड. बेरिया म्हणाले.

९० टक्के काम पूर्ण
जीआयएस मध्ये ३० पेठांचे सर्व्हे झाले. त्यात सुमारे २५ हजार नोंद नसलेल्या मिळकती मिळाल्या. अन्य १५ पेठांत सुमारे १५ हजार मिळकती मिळतील. त्यामुळे महापालिकेचे सुमारे ७० कोटी उत्पन्न वाढेल असे संगणक विभाग प्रमुख सचिन कांबळे म्हणाले.

थर्ड पार्टी आॅडिट करा
^केलेला सर्व्हे सशंयास्पद असल्याने महापालिकेचा रक्कम लाटण्याचा प्रकार आहे. याप्रकरणी थर्ड पार्टी आॅडिट करा. अॅड.यु. एन. बेरिया , काँग्रेस नेते

अशा आहेत तारखा
२२ आॅगस्ट २०१४ - वर्क आॅर्डर
२१ आॅगस्ट २०१५ - कामाची मुदत
फेब्रुवारी २०१६ - महापालिकेत मीटिंग
१८ आॅगस्ट २०१६ - मीटिंग
३० सप्टेंबर २०१६ - मुदतवाढ
२३ नोव्हेंबर २०१६ - अद्याप काम पूर्ण नाही
बातम्या आणखी आहेत...