आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: मुदतीत अंदाजपत्रक मंजुरीचा पेच, 31 मार्चच्या आत मंजुरी बंधनकारक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेच्या अंदाजपत्रकास सभागृहाने ३१ मार्चच्या आत मंजुरी देणे आवश्यक आहे. तत्पूर्वी त्याला स्थायी समितीची मंजुरी मिळायला हवी. सध्या स्थायी समिती अस्तित्वात असली तरी कामकाज करण्यासाठी सभापती नाही. सभापती निवडीची प्रक्रिया तातडीने नाही झाल्यास सत्ताधारी भाजपपुढे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. 
 
अंदाजपत्रक सभेसाठी किमान सात दिवस आधी विषयपत्रिका जारी होणे आवश्यक आहे. त्यापूर्वी स्थायी समितीत त्यावर चर्चा होते. त्यानंतर अंदाजपत्रक सभागृहापुढे येते. 

स्थायी समिती सदस्यांची निवड मार्च रोजी करण्यात आली. या समितीमध्ये १६ जणांची निवड झाली. यानंतर महापालिका प्रशासनाने विभागीय आयुक्तांना पत्राद्वारे सभापती निवडीची तारीख मागितली आहे. विभागाीय आयुक्तांकडून अद्याप उत्तर नाही. त्यामुळे त्यांच्याकडून तारीख निश्चित झाली की त्या तारखेला सभापती पदाची निवड होईल. सभापती निवडीकरीता फॉर्म भरल्यापासून ७२ तासांची नोटीस द्यावी लागते. निवड झाल्यानंतर स्थायीच्या सभेसाठी सदस्यांना तीन दिवसाचा कालावधी देऊन सभा बोलावावी लागते. या दोन्ही प्रक्रियेला सहा दिवस कालावधी खर्ची होतो. 

आयुक्तांनी स्थायीत सादर केलेल्या अर्थसंकल्पीय पत्रकावर चर्चा करून त्यात काही फेरफेर करायची असेल तर स्थायी करू शकते. यानंतर हा सुधारित अंदाजपत्रक महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादर करावा लागतो. यानंतर सात दिवसापूर्वी अजेंडा काढून अंदाजपत्रकीय सभा बोलावली जाते. मात्र अद्याप स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीच्या काहीच हालचाली होत नाही. त्यामुळे पुढे होणाऱ्या अंदाजपत्रकीय सभेसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

एप्रिलमध्ये सभा शक्य 
- स्थायी सभापती निवड झाल्यानंतर अंदाजपत्रकात फेरफार करायची असेल तर त्याला पुरेसा वेळ हवा. घाई गडबडीत कुठलाही निर्णय घेऊ नये. तसेच अंदाजपत्रकीय सभा ३१ मार्चलाच घ्यावी असे काही नाही. त्यासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अंदाजपत्रकीय सभा घेता येते.
” जगदीश पाटील, माजी नगरसेवक 
 
नेत्यांशी उद्याच बोलतो 
- उद्याच महापौर आणि पक्षनेते यांना सांगून स्थायी समिती सभापतिपदाची निवड लवकर करण्यासंदर्भात सांगतो. स्थायीतले बरेच सदस्य जरी नवखे असले तरी त्यांना मार्गदर्शन करणारी फळी ही अनुभवी आहे. त्यांना ही फळी मार्गदर्शन करेल.
” अशोकनिंबर्गी, शहराध्यक्ष भाजप 
 
विभागीय आयुक्तांना पत्र 
- स्थायी समिती सभापती निवडी संदर्भात आम्ही विभागीय आयुक्तांना पत्र दिले. त्यांच्याकडून तारीख निश्चित होताच स्थायी सभापतिपदाची निवड होईल.
” प्रवीणदंतकाळे, नगरसचिव 
 
नाही, मार्चच्या आतच 
महापालिकेची अंदाजपत्रकीयसभा ३१ मार्चच्या आत होणे अनिवार्य आहे. मग ३१ मार्चच्या नंतर घ्यायचा प्रश्नच उद््भवत नाही. २३ मार्चच्या आत स्थायी समिती सभापती निवड होणे गरजेचे आहे.” अॅड.यू. एन. बेरीया, माजी महापौर 
बातम्या आणखी आहेत...