आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायी समिती सभापतिपदी हुंडेकरी, पाच मतांनी विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर- महापालिका स्थायी समितीचे सभापती म्हणून सत्ताधारी आघाडीकडून काँग्रेसचे रियाज हुंडेकरी निवडून आले. युतीच्या श्रीकांचना यन्नम यांचा त्यांनी अपेक्षित पराभव केला.
या पदासाठी शनिवारी निवडणूक झाली. निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी काम पाहिले. स्थायी समिती सभागृहात झालेल्या मतदानात हुंडेकरी यांना आघाडीची दहा मते मिळाली. युतीच्या यन्नम यांना पाच मते मिळाली. बसपचे आनंद चंदनशिवे हे तटस्थ राहिले.

मावळते अध्यक्ष पद्माकर काळे यांनी हुंडेकरी यांना शुभेच्छा दिल्या. याशिवाय उपमहापौर प्रवीण डोंगरे, मनपा सभागृह नेते संजय हेमगड्डी, राष्ट्रवादीचे गटनेते दिलीप कोल्हे, खैरून्निसा सोडेवाले, बिसमिल्ला शिकलगार, पीरअहमद शेख, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार आदींनी हुंडेकरी यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. महापालिका आवारात ढोल-ताशा गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

पाणी स्वच्छतेवर भर देणार
निवडीनंतर हुंडेकरी म्हणाले, की मला काँग्रेस पक्षाने न्याय दिला. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह सर्वांचे अाभार. पाणीपुरवठा आणि स्वच्छतेवर भर देणार आहे. आगामी काळात शहरात पाणीटंचाईचे संकट असून, त्यावर मात करण्याचा प्रयत्न राहणार आहे. महापालिका स्थायी समितीत मनपाचे जमीन देण्याचे विषय येतात. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले, ‘जागेचे विषय आल्यावर ते पाहून निर्णय घेऊ.’