आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखापरीक्षण अाक्षेपावरून मिळकत करात ५ % वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- भांडवलीकरप्रणालीनुसार मिळकत करावरील अाकारणीत यापूर्वी १५ टक्के घसारा पकडून कर अाकारणी केली जात असे. शासन लेखापरीक्षणात १५ टक्के ऐवजी १० टक्के घसारा पकडून मिळकत कर आकारणी करण्यासंदर्भात आक्षेप घेतला गेला. लेखापरीक्षणाची ढाल पुढे करून कर आकारणी विभागाने चालू वर्षाच्या (२०१६-१७) कर आकारणीत पाच टक्के वाढ केली अाहे. स्मार्ट सिटीतील नागरिकांना कराचा स्मार्ट बोजा सहन करावा लागणार अाहे. पाच हजार रुपये मालमत्ता कर असेल तर किमान २५० रुपयांचा बोजा वाढेल.

पालिकेतील मालमत्ता रेकाॅर्डला नावात बदल करून हस्तांतरण करण्यासाठी एक नोव्हेंबर २०१२ ते २८ फेब्रुवारी २०१३ पर्यंत २५११ जणांनी प्रत्येकी हजार रुपये हस्तांतरण फी भरली तर १६३९ जणांनी अर्ज केले. नोटरीवरून नोंद धरता येत नाही असा अभिप्राय चार सप्टेंबर २००८ रोजी अॅड. एस. एस. कालेकर यांनी महापालिकेस दिला. त्यानुसार तत्कालीन आयुक्त अजय सावरीकर यांची मान्यता घेऊन २१ जानेवारी २०१३ पासून नोटरी नोंद बंद केली. त्यामुळे चार हजार १५० जणांच्या नोंदी महापालिका रेकाॅर्डला घेतल्या नाहीत. शहरात सुमारे ५० ते ६० हजार मिळकतींची खरेदी-िवक्री नोटरीवरून झालेली अाहे. नोंद धरल्यास महापालिकस २५ कोटी रुपये मिळतील. तरी कायदेशीर पद्धतीने नोंद करावी, अशी मागणी नगरसेवक मिस्त्री यांनी केली. याबाबत महापौर आबुटे यांनी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आदेश दिले. नोटरी नोंदीबाबत पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, पुणे महापालिकेत प्रतिनिधी पाठवून तेथील माहिती १५ दिवसात संकलित करून त्यानुसार पुढील निर्णय घेण्याचे ठरले.

कायद्यात तरतूद
महापालिका कायद्यात करपात्र मूल्यावर १० टक्के घसारा (वजावट) पकडून भांडवली कर प्रणालीनुसार आकारणी करावी असा नियम असताना १९७० पासून महापालिका १५ टक्के घसारा पकडून कर आकारणी करते आहे. महापालिका कायद्यानुसार आकारणी करण्याची सूचना शासनाच्या लेखापरीक्षण विभागाने केली.

तो प्रस्ताव सापडेना
१९७० साली मनपा सभागृहात १५ टक्के घसारा पकडून कर अाकारण्याचा ठराव झाला. त्यानुसार आकारणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. लेखा परीक्षण विभागाने मनपा आॅडिट करताना तो प्रस्ताव प्रशासनास मागितला, पण तो सापडत नाही. त्यामुळे दहा टक्के घसारा पकडून कर आकारणी करा, असे सांगण्यात आले. शासनाने आॅडिटमध्ये त्रुटी काढल्याने आयुक्तांची मान्यता घेऊन अंमलबजावणी केल्याचे सहाय्यक आयुक्त दगडे-पाटील यांनी सांगितले.

इतर जिल्ह्यातील माहिती घेणार
शहरातीलगुंठेवारी क्षेत्रासह नोटरीवरून खरेदी केलेल्या घरांच्या नोंदी महापालिका रेकाॅर्डला रीतसर धरली जात नाही. त्यामुळे अनेकांचे घरकुल दुसऱ्यांच्या नावाने महापालिकेत नोंद अाहेत. नोटरीवरून नोंद धरावी, अशी वारंवार मागणी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी केली. याबाबत महापौर सुशीला आबुटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी, नगरसेवक मिस्त्री, महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील आदी उपस्थित होते.

उपमहापौरांनी शिवी हासडली
नोटरीबाबतबैठक सुरू असताना उपमहापौर प्रवीण डोंगरे तेथे अाले. बैठक संपल्यावर आमच्या प्रभागातील आरोग्य निरीक्षक नडीकटला यांची बदली का केली? त्यांनी स्वच्छ भारत मिशनमध्ये उत्तम काम केले. चांगल्या काम करणाऱ्यांना का काढले असे म्हणून हद्दवाढ विभागाचे युवराज गाडेकर यांना शिवी हासडली. आयुक्तांच्या टिप्पणीनुसार बदली झाल्याचे सांगण्यात आले.

२०१२ ते २०१८ कालावधी
२५११ हस्तांतर फी जमा
४१५० अर्ज नोंदी प्रलंबित