Home »Maharashtra »Western Maharashtra »Solapur» News About Solapur Municipal Corporation

सोलापूर : महापालिका; पालकमंत्री गटाचा वरचष्मा, सुभाष देशमुख गटाला झटका

प्रतिनिधी | Apr 21, 2017, 09:38 AM IST

  • सोलापूर : महापालिका; पालकमंत्री गटाचा वरचष्मा,  सुभाष देशमुख गटाला झटका
सोलापूर -महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षात स्वीकृत नगरसेवक निवडीवरून घडलेल्या राजकीय डावपेचात पालकमंत्री विजयकुमार देशमुख गटाने दोन्ही जागा अापल्या गटाकडे खेचून घेत सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाला चांगलाच तडाखा दिला. त्यांचे विश्वासू अविनाश महागावकर यांचाच पत्ता कट झाला. तर नवख्या मुन्ना वानकर यांना संधी दिली गेली. या निमित्ताने पक्षातील गटबाजी इंद्रभुवन परिसरात उघडपणे समोर अाली. या घोळात सकाळी ११ होणारी निवड दुपारी १.३० वाजता झाली.
भाजपच्या वाट्याला दोन सदस्यपदे मिळाली. त्यासाठी अाठ जण इच्छुक होते. या दोन्ही जागेवर पालकमंत्र्यांच्या गटाची सरसी झाली. मुन्ना वानकर अाणि प्रभाकर जामगुंडे ही दोन्ही नावे त्यांच्या मर्जीतील अाहेत. या राजकीय फिल्डींगमुळे सुभाष देशमुखांचे विश्वासू अविनाश महागावकर यांचा पत्ता कट झाला. शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी अविनाश महागावकर यांचेही काही चालले नाही. त्यांना सभागृह नेते सुरेश पाटील यांनी थारा दिला नाही. या विषयावर जवळपास अडीच तास राजकीय हालचाली झाल्या. या सर्व प्रकारातून भाजपतील गटबाजी स्पष्टपणे दिसून अाली. भाजपचा पारदर्शक कारभार सत्ता मिळाल्यानंतर महिनाभरातच गळून पडल्याची राजकीय चर्चा वर्तुळात होती.

महापौरांनाही माहिती नव्हती नावे
यासर्व निवडीत महापौर शोभा बनशेट्टी यांना स्वीकृतसाठी कोणाचे नाव नक्की होतेय, हे माहिती नव्हते. त्या या प्रक्रियेपासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे अखेर पालकमंत्र्यांना महापौर अाणि सुरेश पाटील संजय कोळी यांच्यात समन्वय घडवून अाणावा लागला. वानकर आणि जामगुंडे यांच्या नावाची शिफारस भाजप गटनेते पाटील हे सभागृहात करणार असल्याची कुणकुण लागताच शहराध्यक्ष प्रा. निंबर्गी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवारसह कार्यकर्ते महापौर कार्यालयात आले. पक्षाचा निर्णय लेखी पत्राद्वारे देण्याचा प्रयत्न झाला, त्यात महागावकरांचे नाव होते. बंद खोलीत चर्चा झाली पण तोडगा निघाला नाही. सभागृहनेत्यासमोर काहीही चालले नाही म्हटल्यावर प्रा. निंबर्गी, महागावकर हे प्रभारी आयुक्त अरुण डोंगरे यांच्या दालनात जाऊन काही करता येते का? याची चाचपणी केली. त्यानंतर सभागृह नेते पाटील यांनीही आयुक्तांची भेट घेऊन अधिकार माझेच अाहेत, असे सांगितले. पुन्हा महापौर कार्यालयात दीड तास चर्चा झाली. या सर्व घडामोडीत जवळपास दोन तास वाया गेला. सुमारे दीड वाजता सभा सुरू झाली. अाणि अखेर सभागृहात वानकर आणि जामगुंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे महागावकर इतरांना तेथून काढता पाय घ्यावा लागला.
पदाधिकाऱ्यांमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न
महापालिकेत महापौर शोभा बनशेट्टी यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न होत अाहे. महापालिकेचा कारभार सुरेश पाटील अाणि संजय कोळी हेच पाहात असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून अाहे. अाजही त्याचा प्रत्यय अाला. महापौरांनी अाज सभा सुरू होण्यापूर्वी ही नाराजी स्पष्टपणे दाखविली. त्याची दखल घेऊन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी यशस्वी शिष्टाई करत गुरुवारी महावीर सांस्कृतिक भवन येथे सर्वांना एकत्र करून गटबाजी थांबवा, सर्वांनी मिळून काम करा. त्यामुळे पक्षाची प्रतिमा चांगली राहील. त्यानंतर महापौर बनशेट्टी, सभागृह नेते सुरेश पाटील यांनी आपली बाजू मांडली. महापालिकेत कामकाज एकत्र मिळून करण्याचे ठरले. अाता त्याची अंमलबजावणी किती होते हे कारभारातून दिसेलच.

भाजपच्या गटबाजीचा सभागृहाच्या कामास फटका
एकीकडे भाजपात चर्चेचे सत्र सुरू होते. दुसरीकडे विराेधी पक्षांनी ‘महापौर कार्यालयात येऊन सभा तत्काळ सुरू, महापौर सभागृहात चला’ अशा घोषणा दिल्या. काँग्रेसचे चेतन नरोटे, फिरदोस पटेल, बाबा मिस्त्री, शिवसेनेचे गुरुशांत धुत्तरगावकर, कुमुद अंकाराम, बसपचे आनंद चंदनशिवे आदीचा समावेश होता. महापौर कार्यालयात ठिय्या मांडला होता. महापौरांनी शक्कल लढवत दुखवटा प्रस्ताव मांडून सभा तासासाठी तहकूब केली.

शिवसेनेतील दिग्गजांना गप्प बसावे लागले
शिवसेनेतही नवीन चेहऱ्याला संधी दिली गेली. या पदासाठी इच्छुक असलेले सेनेचे सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शहरप्रमुख प्रताप चव्हाण अादी इच्छुक होते. पण सेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी शशिकांत कैंची यांचे नाव सभागृहात दिले. त्यामुळे बरडेंसह सर्वांना गप्प राहण्याशिवाय पर्याय राहिला नाही. बरडे यांनी मुंबईतूनही फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही.
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended