आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांचे काम कॉर्पोरट स्टाइलने पाहण्यात येणार; नगरविकास खात्याचे परिपत्रक, कामांना दिले गुण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिका आयुक्तांच्या कामाला राज्य शासनाने प्रथमच ‘केआरए’ (की रिझल्ट एरियाज) म्हणजेच ‘फलनिष्पत्ती क्षेत्रे’ निश्चित केलेली आहेत. त्याचे मूल्यमापन संबंधित आयुक्तांच्या गोपनीय अहवालात करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. 

कॉर्पोरेट कंपन्यांतील अधिकाऱ्यांच्या कामाचे अशा पद्धतीने मूल्यमापन होत असते. ते आता महापालिकेतही आले. नागरी क्षेत्रामध्ये सातत्याने वाढच होत आहे. वाढते शहरीकरण ही अडचण नसून संधी मानण्यात यावी. त्या दृष्टीने कामे केल्यास शहरांचा विकास होईल. आयुक्तांनी उद्दिष्ट घेऊन कामे करावीत, यासाठीच फलनिष्पत्ती क्षेत्रे निश्चित केल्याचे म्हैसकर म्हणाल्या. राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांनाही याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

असे असतील १०० गुण 
१. विविध करांची वसुली
मालमत्ता कर इतर करांची ८० टक्क्यांपेक्षा जास्त (चालू मागील) वसुली करणे आणि आर्थिक स्थितीत भरीव सुधारणा करणे..........२० गुण 

२. उत्पन्नवाढीसाठी उपाय 
उत्पन्न स्रोताचा पाया बळकट करणे, करवसुलीत ‘जीआयएस’ प्रणालीचा अवलंब करणे, गाळ्यांच्या भाडेदरांचा पुनर्विलोकन............२० गुण 

३. पायाभूत सुविधा प्रकल्प 
जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान अभियान नगरोत्थानमधील रखडलेले प्रकल्प पूर्ण करणे, अमृत योजनेतील कामांना मंजुरी...........१० गुण

४. स्वच्छ महाराष्ट्र अभियान 
संपूर्ण शहर ऑक्टोबर २०१७ पूर्वीच हागणदारीमुक्त करणे आणि प्रत्येकाला स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करून देणे......१० गुण 

५. घनकचरा व्यवस्थापन 
किमान ९० टक्के कचऱ्याचे विलगीकरण करणे, आेला आणि सुका कचरा वेगळा करून त्याचा पुनर्वापर करणे, विल्हेवाट लावणे........३० गुण 

६. सेवाहमीचा अंमल 
सेवाहमी कायद्याचा प्रभावी अंमल करणे, लोकशाही दिन, पीजी पोर्टल यावर कार्यवाही करण्याचे काम...१० गुण 

चांगले नियोजन करता येईल 
शासनानेउद्दिष्टदिले तर संबंधित कामांचे नियोजन करता येईल. कामांना गती मिळेल. पर्यायाने शहराचा विकास होईल. कामाचे मूल्यमापन तर होतच असते. आता वेगळ्या पद्धतीने त्याकडे पाहिले जाणार आहे. त्याचे मी स्वागतच करतो. यंत्रणेला त्याबाबतच्या सूचनाही देतो.
-  अविनाश ढाकणे, आयुक्त, सोलापूर मनपा. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, मनीषा म्हैसकर प्रधानसचिव, नगरविकास यांना थेट प्रश्न...
बातम्या आणखी आहेत...