आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेचा अजब कारभार, भर पावसाळ्यात पाणी टंचाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- औज बंधाऱ्यातील पाणी संपले असून उजनी धरणातून सोडलेले पाणी रविवारी औज बंधाऱ्यात पोचेल. त्यामुळे पुढील काही दिवसांसाठी पाच दिवसांआड पाणीपुरवठ्याचा निर्णय झाला आहे. त्याची अंमलबजावणी उद्या शुक्रवारपासून होणार आहे.
 
महापालिकेच्या नवख्या भाजपच्या कारभारींच्या कामकाजाचा फटका सोलापूरकरांना बसत आहे. नियोजन चुकल्याने भर पावसाळ्यात सोलापूरकरांना उन्हाळ्यासारखी पाणीटंचाईची स्थिती अनुभवावी लागत आहे. शहरास पाणीपुरवठा करणारा औज बंधारा कोरडा असून, टाकळी जॅकवेलला ११ इंच इतके पाणी आहे. शहरात तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा करणे शक्य हाेणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. उजनी धरणातून गुरुवारी सात हजार ५०० क्युसेकने सोडण्यात आले. धरणापासून पाणी ९२ किमी पुढे आले अाहे. आणखी १४० किमी अंतर कापायचे आहे. 

नागरिकांचा उद्रेकपुन्हा दिसून येईल. पाण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. याबाबत अाम्ही वेळीच निवेदन दिले होते. पण त्यांची दखल घेतली नाही. ती घेतली असती तर आज ही वेळ आली नसती.
- आनंद चंदनशिवे, बसपा गटनेता 

आज या भागात होईल पाणीपुरवठा 
साखरपेठ,बुधवार बाजार, गणेश पेठ, पाच्छा पेठ, जमखंडी पूल परिसर, कोंगाड कुंभार गल्ली, शास्त्री नगर, उत्तर कसबा, दक्षिण कसबा, काळी मशिद, सळई मारुती, तरटी नाका, आवंती नगर, लक्ष्मी पेठ, इंदिरा नगर, इरण्णा वस्ती, भूषण नगर भाग ३, राजीव नगर, कोळी सोसायटी, गरिबी हटाव नं.२, अंत्रोळीकर नगर भाग १, बाल शिवयोगी नगर, नई जिंदगी, विजापूर रोड २२ सोसायटी, भारती विद्यापीठ, शेळगी, गिरी सोसायटी, दत्त नगर, शिवाजी नगर, विकास नगर, रत्नदीप सोसायटी, बापूजी नगर, शास्त्री नगर, राम मंदिर, संजय नगर, कुमठा नाका, सुरवसे नगर आदी. 

वेळीच पाठपुरावा नाही 
शहरासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी महापालिका पदाधिकाऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे वेळीच पाठपुरावा केला नाही. सभागृह नेते सुरेश पाटील, स्थायी समिती सभापती संजय कोळी यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासोबत जाऊन निवेदन दिल्याने पाणी सोडले. हे प्रयत्न दोन दिवस अगोदर झाले असते तर पाच दिवसाआडची पाळी आली नसती. 

नियोजन शून्य कारभार 
पावसाळ्यातशहरातपाच दिवसाआड पाणीपुरवठा म्हणजे महापालिकेचे नियोजन शून्य कामकाज आहे. पाण्यासाठी महापौर शोभा बनशेट्टी यांनी पाठपुरावा करुन उजनीतून अगोदर पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. गटाच्या राजकारणात गुंतल्या.
- चेतन नरोटे, काँग्रेस गटनेता 
बातम्या आणखी आहेत...