आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाची आर्थिक स्थिती नाजूक त्यामुळे शहर विकासाला बाधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक होत चालल्याचे दिसून येत आहे. दिवाळीसाठी मनपा कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी रक्कम अद्याप दिली नाही. मक्तेदारांची रक्कम दिली नाही. त्यामुळे मक्तेदार महापालिकेत हेलपाटे मारत आहेत. अशी स्थिती असताना नागरी सुविधांचे कामे करण्यासाठी शासनाकडून १७६ कोटी रुपये अनुदान उपलब्ध असून, त्यात मनपा हिस्सा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी मनपाकडे रक्कम नसल्याने १४ व्या वित्त आयोगातून रक्कम वर्ग करण्याची शिफारस मनपा प्रशासनाने मनपा सर्वसाधारण सभेकडे केली आहे. २० आॅक्टोबर रोजी होणाऱ्या सभेपुढे असे दोन विषय चर्चेसाठी आहेत.
सार्वजनिक शौचालय, कचरा व्यवस्थापन, सफाई कर्मचारी, नगारिकांचे आरोग्य, हरित पट्टे, स्वच्छतेसाठी वाहन खरेदी करणे आदी कामासाठी १४ वे वित्त आयोगातून शासनाच्या वतीने मनपास निधी दिला जातो. असे २६.७३ कोटी मनपाकडे आहे. त्यापैकी मनपा हिश्श्यापोटी सहा कोटी नागरी सुविधांसाठी, मलनिस्सारण योजनेसाठी ७.३१ कोटी जमा करण्याची शिफारस मनपा मुख्य लेखापाल कार्यालयाकडून करण्यात आली आहे. मनपाकडे रक्कम नसल्याने शहरात विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
नागरी सुविधांसाठी ७१ कोटी
१४ वित्त आयोगातून ७१ कोटी अनुदान देण्यात आले असून, मनपाचा हिस्सा म्हणून ३५.५२ कोटी आहे. त्यात मनपाने निश्चित केलेले सात कामासाठी ८.५३ कोटी वजा जाता २६.९९ काेटी शिल्लक अाहेत. ते इतर कामासाठी तरतूद होण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने सभागृहापुढे ठेवला आहे.

पालकमंत्र्यांचा पुढाकार
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शासनाकडून आलेला निधी परत जाऊ नये म्हणून ४६ कोटींच्या कामास मागील वर्षी वर्षाची मुदतवाढ शासनाकडून आणली. तरीही महापालिकेने आपला हिस्सा घालून कामे केली नाहीत.

स्मार्ट सिटीचे ५० कोटी भरले नाही
स्मार्ट सिटी योजनेसाठी केंद्र राज्याकडून दरवर्षी प्रत्येकी १०० कोटी मिळेल. मनपाला ५० कोटी भरणे आवश्यक. स्मार्ट सिटी कंपनीने रक्कम जमा केली नसल्याचा उल्लेख प्रस्तावात नमूद आहे.

काय होईल परिणाम
रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा यासाठी शासनाचा निधी असून, ही कामे होणार नाहीत. ३१ मार्चपर्यंत कामे केल्यास शासनाचा निधी परत जाईल.

मनपा आर्थिक अडचणीकडे
महापालिकेचीवसुली कमी असून, थकीत रक्कमा वसूल करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी मोहीम सुरू केलीे. जप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला. महापालिकेच्या तिजोरीत कोटीही शिल्लक नाही. त्यामुळे मुख्य लेखापाल यांच्यापुढे अडचणी वाढत आहेत. मनपा कर्मचाऱ्यांचे दिवाळी सानुग्रह अॅडव्हान्स रकमा देण्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. कर्मचाऱ्यांच्या संघटनेबरोबर महापालिका आयुक्त वारंवार बैठका घेऊन त्यांचे समाधान करत अाहे. मक्तेदारांचे ६० कोटी थकीत आहेत. यावरून मनपा अार्थिक अडचणीकडे जात असल्याचे दिस्ून येते.

विकासाला फटका
^शहराचा समान विकास होण्यासाठी शासनाकडून आलेला निधी वेळेत खर्च होणे आवश्यक आहे. अन्यथा शासनाच्या रक्कमा परत जातील. मनपा हिस्सा भरल्यास कामे होतील. त्यामुळे तो त्वरित भरावा म्हणून आॅगस्ट महिन्यापासून तीन पत्र दिले. सभागृहात आयुक्तांना जाब विचारू. सुरेश पाटील, नगरसेवक
बातम्या आणखी आहेत...