आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: महापालिका निवडणूक; पहिला निकाल साडेदहापर्यंत, दुपारपर्यंत सत्तेचे चित्र स्पष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामवाडी गोदामात मतमोजणीची तयारी करताना कर्मचारी. - Divya Marathi
रामवाडी गोदामात मतमोजणीची तयारी करताना कर्मचारी.
सोलापूर - महापालिकेच्या २६ प्रभागांतील १०२ जागांसाठी ६२३ उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल बुधवारी लागणार आहे. सकाळी दहा वाजता टपाल मतपत्रिकांच्या मोजणीने सुरुवात करण्यात येणार अाहे. त्यानंतर मतदान यंत्राद्वारे मतमोजणी सुरू होईल. पहिला निकाल साडेदहापर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने निकाल जाहीर होत राहतील. दुपारी एकच्या सुमारास सर्व निकाल हाती आलेला असेल, अशी माहिती निवडणूक प्रशासनाने दिली. 

निवडणुकीत चार लाख एक हजार मतदारांनी कौल दिला. ५९.५६ टक्के मतदान झाले. गुरुवारी सकाळी दहापासून मतमोजणी सुरू होणार आहे. १५ टेबलवर मतमोजणी होणार आहे. दोन ते चार फेरीत मतमोजणी होणार आहे. प्रभाग क्रमांक आठमध्ये सर्वाधिक चार फेरीत मोजणी होईल, दोन फेरीत पाच प्रभागांची मतमोजणी होणार आहे. यासाठी ६८५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी नऊ असून, प्रत्येक अधिकारी स्वतंत्र हाॅलमध्ये मतमोजणी करतील. 

सर्व निकाल हाती आल्यानंतर निवडणूक आयोगाकडून आॅनलाइन प्रमाणपत्र आल्यास विजयी उमेदवारास तत्काळ गुरुवारी देण्यात येतील अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी विजयकुमार काळम यांनी दिली. या वेळी उपायुक्त श्रीकांत म्याकलवार, पोलिस उपायुक्त नामदेव चव्हाण, मनपा प्रभागी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी आदी उपस्थित होते. 
मतमोजणी स्थळावर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीस सोडण्यात येईल. ज्या प्रभागाचे मोजणी आहे त्या प्रभागातील प्रतिनिधींना प्रवेश देण्यात येईल. त्यांनी येताना मतमाेजणी स्थळासाठी देण्यात आलेल्या पाससह ओळखपत्र आणणे अनिवार्य राहिल. प्रतिनिधींना मोबाइलसह इतर साहित्य नेता येणार नाही. मतमोजणी अबकड गटानुसार होईल. प्रत्येक राजकीय पक्षास मतमोजणी प्रतिनिधीशिवाय दोन पास देण्यात आले आहेत. 

वाहनासप्रवेश नाही 
मतमोजणीस्थळावर चारचाकी फक्त १९ वाहने आत जातील. मतमोजणी कर्मचाऱ्यांचे वाहने मोदी पुलाजवळील मोकळ्या जागेत पार्क करता येतील. गंगामाई हाॅस्पिटलसमोर रस्ता सुरू राहील. 
 
पाच प्रभागांची मतमोजणी होणार आहे. यासाठी ६८५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी नऊ असून, प्रत्येक अधिकारी स्वतंत्र हाॅलमध्ये मतमोजणी करतील. 

मतमोजणी स्थळावर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीस सोडण्यात येईल. ज्या प्रभागाचे मोजणी आहे त्या प्रभागातील प्रतिनिधीना प्रवेश देण्यात येईल. त्यांनी येताना मतमाेजणी स्थळासाठी देण्यात आलेल्या पाससह ओळखपत्र आणणे अनिवार्य राहिल. प्रतिनिधीना मोबाईलसह इतर साहित्य नेता येणार नाही. मतमोजणी अबकड गटानुसार होईल. प्रत्येक राजकीय पक्षास मतमोजणी प्रतिनिधीशिवाय दोन पास देण्यात आले आहेत. 

वाहनास प्रवेश नाही 
मतमोजणी स्थळावर चारचाकी फक्त १९ वाहने आत जातील. मतमोजणी कर्मचाऱ्यांचे वाहने मोदी पुलाजवळील मोकळ्या जागेत पार्क करता येतील. गंगामाई हाॅस्पीटलसमोर रस्ता सुरू राहिल. 

पावणे अकरावाजता पहिला निकाल 
मतमोजणी दहा वाजता सुरू होईल. पहिला निकाल पावणेअकरा वाजता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर टप्याटप्याने निकाल जाहीर करण्यात येईल. दुपारी एक पर्यंत सर्व निकाल हाती येतील. त्यानंतर निवडणुक आयोगाकडून आॅनलाईन प्रमाणपत्र आल्यास विजयी उमेदवारास तत्काळ गुरूवारी देण्यात येतील अशी माहिती मुख्य निवडणुक अधिकारी विजयकुमार काळम यांनी दिली. यावेळी उपायुक्त श्रीकांत म्याकलवार, पोलिस उपायुक्त नामदेव चव्हाण, मनपा प्रभागी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी आदी उपस्थित होते. 

ध्वनिक्षेपकावर निकाल 
मतमोजणीच्या स्थळावर निकाल ऐकण्यासाठी सोय करण्यात आली आहे. मोदी जवळील केंद्रीय विद्यालयाजवळ अंतिम निकाल जाहीर होेतील. 

१५०० पोलिस 
उपायुक्त,सहायक अायुक्त, पीअाय, एपीअाय, फौजदार कर्मचारी असा १५०० पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी अाहे. नई जिंदगी, मौैलाली चौक, िवजापूर वेस, पंजाब तालीम, शिवाजी चौक, दत्त चौक, दमाणीनगर, बाळीवेस, शेळगी, बुधवार पेठ, बाळे, अासरा, हत्तुरे वस्ती या भागात फिक्स पाॅइंट पेट्रोलिंग जास्त वाढवण्यात अाले अाहे. मतमोजणी ठिकाणी सहायक अायुक्त प्रमुख राहतील. शिवाय राज्य राखीव दलाची तुकडी अाहे. मुख्य देखरेख पोलिस उपायुक्त करतील, असे सांगण्यात अाले. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, मोदी, हुडको, होम आणि ईदगाह मैदानात पार्किंग...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...