आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदाजपत्रकातील 50 टक्के द्या; उत्पन्नवाढीसाठी ठोस प्रयत्न करा, पालकमंत्र्यांची आढावा बैठक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका अंदाजपत्रक मंजूर होऊन दोन महिने झाले तरी अंदाजपत्रकावर अभिप्राय मिळत नाही. आता तूर्त अंदाजपत्रकातील ५० टक्के निधी मंजूर करा, दिवाळीनंतर उत्पन्न पाहून पुढील निर्णय घ्या. उत्पन्नवाढीसाठी गाळे भाडेवाढ, मुदत संपलेल्या जागा ताब्यात घेऊन उत्पन्न वाढवणे, ‘जीआयएस’ सर्व्हे करणे, कर आकारणीचे नूतनीकरण आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांच्यासमवेत बुधवारी बैठक घेतली. 
 
महापालिकेच्या मक्तेदारांसह इतर ३६८ कोटी देणी तर ३६० काेटी येणी आहेत. मागील वर्षात ३२८ कोटीपैकी २६० काेटींच्या कामास मनपा मुख्यलेखापाल कार्यालयाने मंजुरी दिली. अन्य ६८ कोटींच्या कामांना अभिप्राय दिले नाहीत. यंदा २७८ कोटींचा निधी असून, यापैकी ५० टक्के कामांना अभिप्राय तत्काळ द्यावे, दिवाळीनंतर उत्पन्न पाहता पुढील निर्णय घ्यावेत, अशी भूमिका मनपा सभागृह नेते सुरेश पाटील, स्थायी समिती सभापती संजय कोळी यांनी मांडली. ५० टक्के निधी देण्यास मनपा आयुक्तांनी मान्यता दिली. मनपा प्रशासकीय खर्च १९८ कोटी गृहीत धरले. पण तितके खर्च होत नाही. ताे निधी द्यावा, असे सभागृह नेते पाटील यांनी सांगितले. 
 
उत्पन्नवाढीवर चर्चा 
उत्पन्नवाढीवरदीड तास चर्चा झाली. गाळे भाडेवाढ, मुदत संपलेल्या जागा ताब्यात घेऊन गाळे बांधणे, पारस चौपाटी येथील जागेवरून उत्पन्न वाढवणे, बेकायदेशीर नळ शोधणे, कर आकारणीचे नूतनीकरण करण्यावर चर्चा झाली. मनपाचे उत्पन्न वाढवण्याचे बैठकीत ठरले. 

युजर चार्ज पाणीपट्टी माफीचा प्रस्ताव शासनाकडे 
युजरचार्ज माफ करणे तसेच पन्नास टक्के पाणीपट्टी माफ करण्याचा ठराव मनपा सभागृहात पारित करण्यात आला. ताे प्रस्ताव मनपा आयुक्त डाॅ. ढाकणे शासनाकडे पाठवणार आहेत. शासनाकडे पाठवा, तेथून मंजूर कररून आणू असे बैठकीत ठरले. या वेळी मनपा आयुक्त डाॅ. ढाकणे, मनपा सभागृह नेते सुरेश पाटील, स्थायी समिती सभापती संजय कोळी, मनपा मुख्यलेखापरीक्षक अजयसिंह पवार, मुख्यलेखापाल दत्तात्रय लांेढे, उपअभियंता संदीप कारंजे आदी उपस्थित होते. 
 
दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यासाठी विचार 
उजनी, औज, हिप्परगा तलावातून पाणी येत असल्याने शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याबाबत पालकमंत्री देशमुख आग्रही आहेत. याबाबत बैठकीत चर्चा झाली. पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याबाबत निर्णय घेतो, असे मनपा आयुक्त डाॅ. ढाकणे यांनी या वेळी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...