आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीप्रश्नी लक्षवेधीस नकार दिल्याने गोंधळ; शिवसेना आक्रमक, गोंधळात विषय मंजूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरात उत्सव काळात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने, पाणीप्रश्नी शिवसेना लक्षवेधी मागत होते. पटलावरील विषयावर चर्चा झाल्यानंतर पाण्यावर चर्चा करू, असे मत महापौर शोभा बनशेट्टी यांनी मांडले. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसेना नगरसेवकांनी गोंधळ घातल्याने अखेर सभा तहकूब करावी लागली. दरम्यान गोंधळातच विषयांना मंजुरी देण्यात आली. 
 
जून महिन्याची तहकूब झालेली सभा मंगळवारी सायंकाळी घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीला काही विषयांना मंजुरी मिळाल्यानंतर पाण्यावरचर्चा सुरू झाली. शिवसेनेचे नगरसेवक धुत्तरगावकर यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष करत, पाण्याचे नियोजन नाही. पाण्याच्या पंप हाऊसमध्ये झोपा काढणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा. पालकमंत्री सहकारमंत्री गटाचे राजकारण करता पाण्याचे नियोजन करा, असे म्हणत पाणीप्रश्नाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यास नगरसेवक अॅड. यू. एन. बेरिया यांनी आक्षेप घेतला. यावरून शिवसेनेचे देवेंद्र कोठे आणि धुत्तरगावकर, बडूरवाले हे आक्रमक झाले. सत्ताधाऱ्यांच्या धिक्कारांच्या घोषणा देण्यात आल्या. गटबाजी करण्यापेक्षा पाण्याचे नियोजन करा, असे नगरसेवक आनंद चंदनशिवे म्हणाले. दरम्यान महापौरांच्या मदतीसाठी नगरसेवक नागेश वल्याळ, नगरसेविका फिरदोस पटेल धावून आले. गोंधळ वाढल्याने महापौर बनशेट्टी यांनी सभा तहकूब केली. गोंधळातच विषयांनी मंजूरी देण्यात आली. 
 
याविषयांना मंजुरी 
मंगळवारीझालेल्या मनपा सभेत नगररचना विभागातील शुल्क वाढीस परवानगी देणे, दयानंद काॅलेज परिसरातील ड्रेनेज लाईन घालणे, एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांना मनपा सभेत गैरहजर राहण्यास परवानगी देण्यात आली.संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडा बाजार भरण्यासाठी कर्णिक नगर येथील चिल्ड्रन पार्क येथे पणन मंडळास चार हजार चौरस मीटर तर शाहीर नगर येथे दोन हजार चौरस मीटर जागा ११ महिने विनामूल्य देण्याचा प्रस्ताव होता. पण एक छतास १०० रुपये दर महापालिकेने आकारावा, अशी सूचना होती. त्यास मान्यता देण्यात आली. गोंधळात सभागृह नेते सुरेश पाटील यांनी विषयांचे वाचन केले. त्यावर विरोधी पक्षाकडे उपसूचना असताना त्यांनी वाचन केले नाही म्हणून विषयास एकमताने मान्यता देण्यात आली. 
 
आयुक्त काळे यांच्यात वाद 
मनपा सभा संपल्यानंतर भाजपचे नगरसेवक राजेश काळे मनपा आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांच्यात महापौर कक्षात वाद झाला. मुख्यलेखापाल दत्तात्रय लोंढे यांच्याबाबत नगरसेवक काळे यांनी तक्रार केली असता वाद उदभवला. 
 
विधान सल्लागारावर कारवाईस मान्यता 
महापालिकेचे विधान सल्लागार अॅड. अरुण सोनटक्के चुकीचे निर्णय देत असून, हद्दवाढ विभागातील कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव नगरसेविका वहिदाबी शेख, वहिदाबानो शेख, शहाजीदाबानो शेख यांनी दिला. त्यावर कारवाई करण्यास मान्यता सभागृहाने दिली. 
 
बातम्या आणखी आहेत...