आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रखडलेल्या दुहेरीकरणाबद्दल पंतप्रधान कार्यालयाने खडसावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर रेल्वे विभागात रखडलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलीच तंबी दिली. परिणामी दुहेरीकरणाचे काम वेगाने व्हावे, या करिता दिल्लीहून सूत्रे हलण्यास सुरुवात झाली. 


नुकतीच मुंबईत मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी बैठक घेऊन ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत दुहेरीकरणाचे काम कसल्याही परिस्थीतीत पूर्ण करण्याचे आदेश आरव्हीएनएलला दिले आहेत. पाच वर्षांत केवळ ४५ किमीच्या मार्गावर दुहेरीकरणाचे काम झाले आहे. आता एक वर्षात १८० किमीचे काम करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. 


सोलापूर हे मुंबई ते चेन्नई या सुवर्ण चतुष्कोन रेल्वे मार्गावरचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनास्थेमुळे केवळ हाच भाग दुहेरीकरण विद्युतीकरणपासून वंचित राहिला. हाच धागा पकडत पंतप्रधान कार्यालय आता या कामावर लक्ष ठेवून असल्याने रेल्वे प्रशासनाची आता भांबेरी उडाली आहे. 


सोलापूर रेल्वे विभागात मोहोळ ते भिगवन १२७ किमी होटगी ते गुलबर्गा ९८ किमीच्या मार्गावर दुहेरीकरणाचे काम ठरले. २०१२ मध्ये दुहेरीकरण विद्युतीकरणाच्या कामास प्रारंभ झाला. मात्र रेल्वे प्रशासन आरव्हीएनएल यांच्यात सुसूत्रता नव्हती. दुहेरीकरणाच्या कामास प्राधान्य दिले गेल्याने पाच वर्षांत केवळ २२५ किमीपैकी केवळ ४५ किमीच्या मार्गावरच दुहेरीकरण झाले. यात मोहोळ ते भिगवन मार्गावर मोहोळ ते वाकाव २२.५ किमी तर होटगी ते गुलबर्गा मार्गावरील होटगी ते अक्कलकोट रोड मार्गावरील २०.३ किमीचे काम झाले. जवळपास आता १८० किमीच्या मार्गावर दुहेरीकरणाचे काम होणे बाकी आहे. 


आता उद्दिष्ट २०१८ 
२०१२ मध्ये सुरू झालेल्या कामास २०१६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र कोणत्या कोणत्या सबबीखाली ते पूर्ण झाले नाही. २०१६ मध्ये पुन्हा आरव्हीएनएलने यासाठी चार वर्षांची मुदत वाढवून घेतली. २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे त्यांना उद्दिष्ट पुन्हा देण्यात आले. मात्र आता पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतल्याने २०२० पर्यंतचे उद्दिष्ट २०१८ पर्यंत कमी करण्यात आले आहे. 


उद्दिष्ट गाठतील का? 
आरव्हीएनएलची गेल्या पाच वर्षातील कामाची गती लक्षात घेता एक वर्षात ते उद्दिष्ट पूर्ण करतील का या वर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ३६५ दिवसांत १८० किमी मार्गावर दुहेरीकरण करावे लागणार आहे. याचा अर्थ रोज किमान किमी ट्रॅक टाकून तो जोडावा लागणार आहे. 


मुदतीत काम संपवण्याचा प्रयत्न 
सरव्यवस्थापकांनी आम्हाला काम लवकरात लवकर संपवावे, असे सांगितले आहे. त्यानुसार कामाला गती देण्यात आली आहे. दिलेल्या उद्दिष्टामध्ये काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- आनंद स्वरूप, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, आरव्हीएनएल, मुंबई 

बातम्या आणखी आहेत...