आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीअंतर्गत लोकसहभागातून राबवणार शून्य कचरा मोहीम, 7 प्रभागांमध्ये मोहीम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील गावठाण भागातील सात प्रभागांमध्ये ते २९ सप्टेंबर या कालावधीत स्मार्ट सिटीअंतर्गत लोकसहभागतून शून्य कचरा मोहीम राबवण्यात येणार आहे. जनजागृतीसाठी शहरातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी १६ समितींची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती मनपा आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली. 
 
संपूर्ण शहर स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून एरिया बेस्ड डेव्हलपमेंट असलेल्या सात प्रभागांमध्ये शून्य कचरा मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम २० दिवस चालणार असून, गावठाण भागातील २, ३, ४, ७, ८, १५ २२ या सात प्रभागांतील प्रत्येक घरांमध्ये जाऊन कचरा जमा केला जाणार आहे. यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्न्मेंट यांची मदत घेतली जाणार आहे. शहरातील समाजसेवा व्यवस्थापन महाविद्यालयांच्या प्राचार्यांचीही बैठक घेतली आहे. शून्य कचरा राबवण्यासाठी शहरातील व्यावसायिक, उद्योजक, कारखानदार यांनी स्वच्छतेसाठी आवश्यक असलेले झाडू, स्वयंसेवकांना हातमोजे, टोपी, टी शर्ट आदी साहित्य पुरवण्याचे आवाहन आयुक्त ढाकणे यांनी केले. 
 
महाविद्यालयांच्या प्राचार्यांचीही बैठक घेतली आहे. शून्य कचरा राबवण्यासाठी शहरातील व्यावसायिक, उद्योजक, कारखानदार यांनी स्वच्छतेसाठी आवश्यक असलेले झाडू, स्वयंसेवकांना हातमोजे, टोपी, टी शर्ट आदी साहित्य पुरवण्याचे आवाहन आयुक्त ढाकणे यांनी केले. 
 
समितीसाठी स्पर्धेचेही आयोजन... 
शून्य कचरा संकल्पना राबवण्यासाठी १६ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक समितीला क्षेत्र वाटप करण्यात आले आहेत. यामध्ये परिसरातील नागरिकांना कचरा निर्मूलन सार्वजनिक स्वच्छतेबाबत प्रबोधन करावे, कचरा कुंडीतच टाकला जाईल, याची दक्षता घेणे. कचरा साठल्यानंतर संबंधितांकडून कचरा उचलला जाईल, याचा पाठपुरावा करणे. दैनंदिन अहवाल सादर करणे. नेमून दिलेल्या क्षेत्रातील सार्वजनिक शौचालये, मुतारी स्वच्छ ठेवणे. याशिवाय स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी उत्कृष्ट घोषवाक्य यावरही स्पर्धा घेतली जाणार आहे. नियुक्त केलेली ठिकाणे घोषवाक्य यामध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्या पहिल्या तीन क्रमांकांना पारितोषकही दिले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. 
 
1 हजार ४० एकर परिसर... 
शहराच्या गावठाण भाग असलेल्या हजार ४० एकर परिसरात शून्य कचरा मोहीम राबवली जाईल. यासाठी सप्टेंबर रोजी या मोहिमेत सहभागी अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचे प्रशिक्षणही घेण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर कचरा उचलण्यासाठी वेळ ठरवून दिली जाईल. त्यानुसार कचरा गोळा केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील हा प्रयोग म्हणून हाती घेतला जाणार आहे. यानंतर ही संकल्पना पूर्ण शहरामध्ये राबवली जाणार असल्याचे आयुक्त ढाकणे म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...