आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारच्या स्मार्ट सिटीचे काम केवळ कागदावरच सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मोदीसरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत सोलापूर शहराचा समावेश नवव्या क्रमांकावर झाला. त्यासाठी केंद्र सरकारकडून २४६ कोटी मिळाले. सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी स्थापन करण्यात आली. योजनेचे उद््घाटन खूप गाजावाजा करून झाले. मात्र, प्रत्यक्षात विकासकामे सुरू झालेली नाहीत. 
 
दरम्यान, दोन वेळा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बदलले. रस्त्याची वर्क आॅर्डर देण्यापलीकडे काहीच काम झालेले नाही. नवनियुक्त सल्लागार, महापालिकेचे अधिकारी हातावर हात ठेवून बसून असल्याचे चित्र आहे. 

शहराच्या १०६४ एकर भागात स्मार्ट सिटीचे काम होणार आहे. पाच वर्षांत हजार १६७ कोटींचे काम अपेक्षित आहे. केंद्र राज्य सरकारकडून पहिल्या वर्षाचे हिस्सा २४६ कोटी रुपये कंपनीस मिळाले. त्या रकमेचे व्याज जमा होते. महापालिकेने आपला दोन वर्षांचा १०० कोटींचा हिस्सा समावेश केला आहे. जुजबी बैठकांचा देखावा सुरू आहे. सुरुवातीला कंपनीच्या पहिल्या सीईओ अमिता दगडे यांची बदली. त्यानंतर आलेल्या उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी राजीनामा दिला. नवीन सीईओंची नियुक्ती नाही. कंपनीचे चेअरमन मिलिंद म्हैसकर यांनी बैठक घेतल्या. विकासकामे उद््घाटन कार्यक्रम तांत्रिक कारणामुळे दोनदा पुढे ढकलला. 

कंपनीकडे अधिकारीच नाहीत 
सीईओ तेली यांची बदली झाली, चेअरमन मिलिंद म्हैसकर वैयक्तिक कारणामुळे रजेवर आहेत. महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्याने काम थांबले आहे. 

काहीच काम नाही 
किल्ला बागेत उद््घाटन केले. पण त्याचे काम अद्याप सुरू झाले नाही. रंगभवन चौक ते डाॅ. आंबेडकर चौकापर्यंत १.२ किमीचा रस्ता करण्यात येणार आहे. २१ कोटींचा मक्ता निखिल कन्स्ट्रक्शन पुणे यांना देण्यात आला. त्यांना वर्कआॅर्डरही दिला. पण ते उद््घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपचे वर्चस्व आले. मात्र, कामकाजात गुणात्मक फरक पडला नाही. त्यांच्याच पक्षाच्या पंतप्रधानांनी गाजावाजा करून जाहीर केलेल्या योजनेकडे दुर्लक्ष होत आहे. 
बातम्या आणखी आहेत...