आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: रंगभवन चौकाचे रूपडे पालटणार, हरिभाई प्रशालेसमोर भुयारी रस्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्मार्टसिटी योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यातील कामाचा आराखडा तयार आहे. या आराखड्याला १८ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत मंजुरी मिळेल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असून, श्री शिवछत्रपती रंगभवन चौकाचे रूपडे पालटणार आहे. हा चौक सोलापूरची ओळख ठरणार आहे, असा विश्वास महापालिका आयुक्त विजयकुमार काळम यांनी व्यक्त केला आहे. 
 
आराखडा मंजूर होताच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन पहिल्या टप्प्यात पावणेदोन किलोमीटरचा स्मार्ट रस्ता केला जाणार आहे. पहिला टप्पा जुलै २०१७ मध्ये पूर्ण करायचा आहे. या कामाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी पुणे येथील अर्बन ट्री या कंपनीला देण्यात आली होती. त्यानुसार कंपनीने बुधवारी (१ मार्च) आयुक्तांसमोर सादरीकरण केले. आराखडा तयार करणे, निविदा काढणे, कामाची देखरेख करणे, कामावर पूर्ण नियंत्रण ठेवणे ही या कंपनीची जबाबदारी असणार आहे. या कामासाठी ३२ लाख रुपये या कंपनीस देण्यात आले आहेत. सादरीकरणानंतर आयुक्त काळम यांनी माध्यमांना माहिती दिली. 

रंगभवनचे आयलँड होणार नयनरम्य 
रंगभवनचेआयलँड पूर्णपणे विकसित होणार आहे. येथे हिरवळ असेल. बसण्याची उत्तम सोयही असणार आहे. तसेच खांबावर उभारण्यात आलेला छत हा रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघेल. रात्री वेळेनुसार याची रोषणाईचे रंग बदलत जातील. तसेच या आयलँडला जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करण्यात येणार आहे. 

हा रस्ता होईल स्मार्ट 
रंगभवन, डफरीन, डाॅ. आंबेडकर चौक ते भय्या चौक हा १.७ किलोमीटरचा रस्ता हा “स्मार्ट रस्ता’ म्हणून विकसित केला जाणार आहे. यामध्ये रस्त्याच्या पदपथावर पादचारी आणि सायकलवाल्यांची सोय असणार आहे. सिटी गॅलरीमध्ये सोलापूर पूर्वी काय होते, आज काय आहे, उद्या कसे होणार याची माहिती असेल. याची जागा अद्याप निश्चित झाली नाही. एलईडी पथदिवे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील. 

पादचाऱ्यांसाठी असेल भुयारी मार्ग 
हरि भाईदेवकरण प्रशालेपासून ते ज्ञानप्रबोधिनी प्रशालेदरम्यान पादचाऱ्यांसाठी एक भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. याची लांबी ६० मीटर असणार आहे. भुयारी मार्ग हा २० मीटर लांबीचा असेल, उंची तीन मीटरची असणार आहे. या मार्गावर वाहनांना बंदी असणार आहे. 
स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात रंगभवन चौक विकसित झाल्यानंतर असा आकर्षक दिसेल.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, पर्यटकांना मिळेल येथे माहिती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
 
बातम्या आणखी आहेत...