आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायाभूत सुविधा, स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पायाभूत सुविधा, स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरण, स्मार्ट सोल्यूशन, सुधारित जीवन गुणवत्तेचे काम म्हणजे स्मार्ट सिटी आदी आठ उद्देश ठेवून काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात १०० टक्के कचरा व्यवस्थापनाचा समावेश आहे. स्मार्ट सिटीच्या कामात ते ४, ७, ८, १४ ते १६ आणि प्रभाग क्रमांक २२ या प्रभागातील अंशत: भागांचा समावेश आहे.
स्मार्ट सिटी सल्लागार मंडळाची बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, महापौर सुशीला आबुटे, राष्ट्रवादीचे मनपा गटनेते पद्माकर काळे, शिवसेना गटनेते भीमाशंकर म्हेत्रे, बसप-माकप गटनेते आनंद चंदनशिवे, स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ संजय तेली, राहुल कुलकर्णी, क्रिसील कंपनीचे पार्थिव सोनी आदी उपस्थित होते.
आमदार शिंदे यांनी ई- टाॅयलेटबाबत विचारणा केली. श्री. काळे यांनी शिवाजी चौकातील उड्डाणपूल होणार आणि पुतळ्याबाबत विचारणा केली. मेघडंबरी बसवावी, अशीही सूचना केली. नगरसेवक चंदनशिवे यांनी डाॅ. आंबेडकर अस्थिविहार येथे पर्यटनस्थळ करण्याविषयी विचारणा केली.
महापौर आबुटे यांनी डिसेंबरपूर्वी काम सुरू व्हावे. माझ्या कार्यकाळात स्मार्ट सिटीची घोषणा झाली. त्यामुळे माझ्या कार्यकाळात काम सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सुविधा अशा
पायाभूत सुविधा : चोवीस तास पाणीपुरवठा वीज, घनकचरा व्यवस्थापन, गटारी, चांगले रस्ते वाहतूक. स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरण : वाढलेली हिरव्या जागा विकसित करणे, कमी प्रदूषण, स्वच्छ तलाव, सीएनजीवर धावणाऱ्या बस. स्मार्ट सोल्यूशन : स्मार्ट मीटर प्रणाली, स्काॅडा प्रणालीचा वापर, ऊर्जा कार्यक्षम पथदिवे.
२१६७.५६ कोटीची कामे अशी (कंसात खर्च कोटीत)
स्वच्छ शहर १०० टक्के कचरा व्यवस्थापन (३४.०४)
ही कामे : कचरागोळा वाहने, रस्ते स्वच्छता मशीन, कचरा पेटी, शौचालय
धूळप्रदूषण कपात, रस्ते फेरआराखडा (२७१.०८)
ही कामे : फूटपाथपुन्हा आराखडा, सायकल ट्रॅक.
स्वच्छआणि कार्यक्षम ऊर्जा वापर (१५७.०८)
ही कामे : सौरपथदिवे, सरकारी इमारत इंदिरा गांधी स्टेडियम बस स्टाॅपवर सौर ऊर्जा यंत्रणा, भूमिगत केबल.
कार्यक्षमसार्वजनिक वाहतूक (९४५.७१)
ही कामे : रेल्वेस्टेशन परिसर सुधारणा, जुना पुणे नाका ते सात रस्ता उड्डाणपूल, चौक सुधारणा सीसीटीव्हीसह, स्मार्ट पार्किंग, मोबाईल अनुकरण, बस स्टाॅप सुधारणा, माहिती विश्लेषण केंद्र.
पाणीपुरवठा(९१.४९)
ही कामे : नेटवर्कमजबुतीकरण, स्मार्ट मीटर.
सांडपाणीपुनर्वापर (२८८.४८)
ही कामे : सांडपाणीसंकलन, पुनर्वापर संच.
सार्वजनिकजागांचा प्रभावी वापर (९४.१६)
ही कामे : इंदिरागांधी स्टेडियम पुनर्जीवन, ओपन जीम, हिरव्या जागाचा विकास, सिद्धेश्वर तलाव विकास, भुईकोट किल्ला प्रकाश योजना लेझर शो, रात्रीचा बाजार, वारसा संरचना सुधारणा.
कार्यक्षमप्रशासन (२८५.५२)
ही कामे : नागरीसुविधा केंद्र, पाणीपुरवठा मीटरिंग, भौगोलिक तांत्रिक माहिती केंद्र, बसचे वेळापत्रक सिस्टिम, सेवा एकत्रीकरणासाठी स्काॅडा प्रणाली, सर्व्हिससाठी मोबाइल अॅप्लिकेशन डेटा केंद्र.
बातम्या आणखी आहेत...