आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथदिवे बसवण्यास २७ टक्के जादा रक्कम दिल्याचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रेल्वेस्टेशन ते जुना बोरामणी नाकापर्यंत राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे बसवण्याच्या कामास २७ टक्के जादा दर दिले. हे काम सशंयास्पद असल्याचा आरोप स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला. त्यामुळे हा विषय फेरसादर करण्याचा आदेश सभापती पद्माकर काळे यांनी दिला.

शहरात सिग्नल यंत्रणा दुरुस्तीचा मक्ता दिला होता. मक्तेदाराने देखभाल व्यवस्थित केली नाही. याबाबत महापालिकेने नोटीस देऊनही कंपनीने पत्रव्यवहार केला नाही. तसेच, दंडाची रक्कम भरली नाही. त्यामुळे त्यांचा मक्ता रद्द करण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला. सिग्नल यंत्रणा दुरुस्तीचा मक्ता दुसऱ्यांना देण्यात आला. यूसीडीमधील समूह संघटिका, बालवाडी शिक्षिका सेविकासह २४५ जणांना २५० रुपयांची मानधनात वाढ करण्यात आली.
दुभाजकात पथदिवे बसवण्यासाठी कोटी १० लाख रुपयांच्या कामास मंजुरी मिळावी म्हणून विषय स्थायीपुढे होता. त्यावर नगरसेवक आनंद चंदनशिवे, चंद्रकांत रमणशेट्टी, अविनाश पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी विरोध केला. विद्युत विभागाचे उपअभियंता राजेश परदेशी यांनी बेकायदा काम केल्याचा आरोप त्यांनी केला. हा विषय तूर्त तहकूब करण्यात आला. सिध्देश्वर काठी मार्गावर अंडरग्राऊंड केबल टाकण्यास बहुमताने मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्रमांक २१ मधील खासगी घंटागाडीवरील चालकांना ड्रेसकोड भांडवली कामातून देता येत नाही. उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी दिले ते बेकायदेशीर असल्याचा आरोप नगरसेवक सुरेश पाटील यांनी केला. विषय बहुमताने मान्य करण्यात आला.