आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाने केल्या पदवी प्रमाणपत्रासाठी सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर विद्यापीठाने यंदापासून पदवी प्रमाणपत्रे हाताळण्यास योग्य ठरेल अशा ‘ए ४’ साईजमध्ये देण्याचे निश्चित केले आहे. त्याचबरोबर ऑनलाइन पद्धतीनेही या प्रमाणपत्रांची क्युसी कोड द्वारे पडताळणी करता येणे शक्य होणार आहे.

विद्यापीठाने कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या उपस्थितीत नॅशनल अॅकॅडमिक डिपॉझिटरी संस्थेशी करार केला. यामुळे विद्यार्थ्यांच्या अकौंटमध्ये इलेक्ट्रॉनिक फार्ममध्ये पदवी प्रमाणपत्र डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध राहील. दीक्षांत समारंभानंतर पदवी प्रमाणपत्रे टपालाद्वारे पाठविण्यात येतात. मात्र या प्रक्रियेत बराचसा काळ जातो. त्यामुळे पदवी प्रमाणपत्र प्राप्त होण्यास विलंब लागतो. तथापि या डिजिटल सुविधेमुळे विद्यार्थ्यांना पदवीप्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध होईल. अशी सुविधा देणारे सोलापूर विद्यापीठ राज्यात पहिले ठरणार आहे.

कोडशिवाय प्रमाणपत्र नाही : समारंभातप्रमाणपत्र घेण्यासाठी विद्यार्थ्यांना डिग्री कोड एसएमएसद्वारे पाठविण्यात आले आहेत. हा कोड असल्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही. या कोडची माहिती विद्यार्थ्यांच्या नावांसह विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सातकाऊंटर उपलब्ध : प्रमाणपत्रघेण्यासाठी सामाजिक शास्त्र संकुलात सात काऊंटर उपलब्ध असतील. सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत किंवा समारंभ संपल्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत मिळेल. झगाही उपलब्ध असेल.
आज दीक्षांत समारंभ, विद्यापीठ सज्ज
सोलापूरविद्यापीठाचा अकरावा दीक्षांत समारंभ उद्या शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठ प्रांगणात होणार आहे. खासदार प्रा. भालचंद्र मुणगेकर प्रमुख पाहुणे आहेत.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार असतील. परीक्षा नियंत्रक डॉ. पी. बी. पाटील मिरवणुकीच्या अग्रभागी असतील. या वेळी २८ गुणवंतांना सुवर्णपदकाने गौरवण्यात येईल. एकूण ७९ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात येणार आहे. पात्र एकूण २४ हजार ६१६ पैकी हजार २९१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यातील हजार ९५० विद्यार्थी उपस्थित राहून पदवी स्वीकारणार आहेत. दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठ नगरी सज्ज झाल्याची माहिती कुलसचिव शिवशरण माळी यांनी दिली.
सोलापूरविद्यापीठाने यंदापासून पदवी प्रमाणपत्रे हाताळण्यास योग्य ठरेल अशा ‘ए ४’ साईजमध्ये देण्याचे निश्चित केले आहे. त्याचबरोबर ऑनलाइन पद्धतीनेही या प्रमाणपत्रांची क्युसी कोड द्वारे पडताळणी करता येणे शक्य होणार आहे.