आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक आर्थिक लोकशाही देशात अद्याप स्थापित झाली नाही, सोलापूर विद्यापीठातील सूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- एफटीआय असो, रोहित वेमुलाचा राजनैतिक खून असू द्या किंवा दिल्लीतील जेएनयूमधील घटना असू द्या... विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून का घेतले जात नाही? विद्यार्थ्यांना घाबरणारे सरकार तानाशाही गाजविण्याच्या मार्गावर उभे नाही का, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या अॅड. तिस्ता सेटलवाड यांनी उपस्थित केला. सोलापूर विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्षता या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी रवींद्र मोकाशी होते.
सेटलवा डम्हणाल्या, देशातील सध्याचे आरएसएस विचार असलेल्या सरकारकडून धर्मनिरपेक्ष शब्द म्हणजे जणू शिवीच असल्यासारखे मुद्दाम बनविले जात आहे. रोहीत येमुला खूप ब्रिलिंयट असा मुलगा. त्याची शिष्यवृत्ती थांबली होती, त्याने कुलगुरूंना पत्र लिहून व्यथा कळविली होती. तर सत्तारूढ केंद्रातील उच्चपदस्त, मंत्री यांनी पाच पाच पत्रे लिहून या मुलाची शिष्यवृत्ती थांबविली. शेवटी रोहीतने जीवनांत केला. हा राजकीय खूनच ठरतो. श्रमण आणि ब्राम्हण यांच्यात शेकडो वर्षांपासूनचा संघर्ष आहे, दुर्देवाने तो आजही सुरूच आहे.

समानतेच्या चर्चा करताना सर्वच धर्मियांच्याबाबत चर्चा केली पाहिजे. प्रत्येक धर्म, त्यातील वंचित घटक, महिला यांच्यात समानता आणली जाण्याचा आग्रह धरला पाहिजे. दुर्देवाने तसे होत नाही.

निर्भयाच्या वेळी झालेल्या आंदोलनात प्रसार माध्यमांनी मोठी भूमिका बजावली. पण आज जेव्हा दलित विद्यार्थी दिल्लीत आंदोलन छेडतो आहे तेव्हा त्यावर प्रसार माध्यमे चुप्पी का साधतात ? हा प्रश्न महत्वाचा वाटत नाही. खाप पंचायतीच्या एखाद्या निर्णयावर जेवढी राष्ट्रीय पातळीवर चर्चा होते तेवढी विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबत राष्ट्रीय माध्यमे करीत नाही. हे सर्व काय दर्शविते ?

गांधीहत्या हा पहिला दहशतवादी हत्या
गांधीहत्या ही पहिला दशहतवादी हत्या आहे. १९३३ ते १९४८ या काळात गांधींवर एकूण पाच हल्ले झाले. त्यात तीन वेळेस नथुराम सहभागी होता. तेव्हा तर पाकीस्तानची निर्मितीही झाली नव्हती. अर्थात गांधीवाद बद्दल अनेक प्रश्न आहेतच पण तो विषय आहे. सोशल मिडियातून युवकांनी व्यक्त होत आपले विचार तेवढ्याच ताकदीने मांडले जावेत.

घटनेत धर्म स्वातंत्र्य
डॉ. वाघमारे म्हणाले, सेक्युलॅरिझम हा शब्द आधी राज्यघटनेच्या प्रस्तावनेत नव्हता. घटनादुरुस्ती करून तो घातला गेला. नंतर वगळला.. असे असले तरी राज्यघटनेत धर्मनिरपरेक्षता अभिप्रेत असतेच. लोकशाहीची जपणूक करताना जात, धर्म, लिंग, वंश अशा कोणत्याही बाबींवर भेदाभेद अपेक्षित नसते. उलट जातनिरपेक्षता, वंश निरपेक्षता, लिंग निरपेक्षता म्हणजे धर्म निरपेक्षता मानली पाहजे.

सोलापूर विद्यापीठात अायोजित कार्यशाळेचे उद्‌घाटन दीपप्रज्वलन करून करताना माजी खासदार डाॅ.जनार्दन वाघमारे. यावेळी प्रा.बेन्नुर, काॅ.शिराळकर, अॅड.सेटलवाड, प्रा.एम.अार.कांबळे अादी.