आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक वर्षाच्या आरंभीच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, नव्या कायद्यानुसार असे करणारे पहिले विद्यापीठ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-  सोलापूर विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमांच्या ऑक्टोबर १७ तसेच मार्च १८ या दोन्ही सत्रातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणारे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. नव्या विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार विद्यापीठाने अंमलबजावणी केली आहे. 
 
ऑक्टोबर २०१७ मधील बी ए, बी. कॉम. वर्गाच्या परीक्षा २४ ऑक्टोबर बी.एस्सी वर्गाच्या परीक्षा ३१ ऑक्टोबरपासून सुरू होतील. एमए, एमएस्सी, एम कॉम वर्गाच्या परीक्षा १८ नोव्हेंबरपासून तर अभियांत्रिकीच्या परीक्षा या २८ नोव्हेंबरपासून सुरू होतील. 
 
मार्च २०१८ मध्ये बी ए, बी. कॉम. परीक्षा २१ मार्च, बी.एस्सी परीक्षा २७ मार्च, एम.ए, एम कॉम, एमएस्सी परीक्षा १८ एप्रिल तर अभियांत्रिकीच्या परीक्षा या मेपासून सुरू होतील. 
 
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचेनियोजन करणे सोयीचे होईल. इतर विद्यापीठाच्या तुलनेत सोलापूर अग्रेसर ठरले.” 
- बी.पी. पाटील, संचालक, परीक्षा विकास मंडळ, सोलापूर विद्यापीठ 
बातम्या आणखी आहेत...