आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ निवडणुका मागासवर्गीय संघटना स्वबळावर लढवणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद निवडणुका २५ सप्टेंबर रोजी होत आहेत. ही निवडणूक बहुजन पुराेगामी मागासवर्गीय संघटना स्वबळावर लढवणारे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. राजकुमार सोनवले यांनी दिली. 
 
गुरुवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे. विद्यापीठात स्वच्छ कारभार पारदर्शकता आणण्यासाठी ही निवडणूक गरजेची आहे. म्हणून बहुजन पुराेगामी प्राध्यापक शिक्षकेतर संघटना निवडणूक लढवत असल्याचे प्रा. सोनवले म्हणाले. 
 
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेने बैठक घेऊन रणनीती ठरवली. या बैठकीस प्रा. सुहास उघडे, प्रा. प्रदीप कोल्हे, प्रा. डॉ. इ. जा. तांबोळी, प्रा. डॉ. दिलीप कसबे, प्रा. आर. बी. कांबळे, प्रा. काळे, प्रा. डॉ. बी. एन. आदटराव, प्रा. डॉ. संजय गायकवाड, प्रा. डॉ. वागज जाधव, प्रा. डॉ. सौदागर साळंुखे उपस्थित होते. 
 
सिनेटच्या निवडणुकीत सोलापूर विद्यापीठ टीचर्स असोसिएशन अर्थात सुटा ही संघटना प्रबळ मानली जाते. मात्र इतर संघटनेला पुरेसे प्रतिनिधीत्व मिळाल्याने यंदाची निवडणूक दुरंगी काही जागांवर तिरंगी होण्याची शक्यता आहे. सुटा संघटनेसह वालचंद शिक्षण समूह, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बहुजन मागासवर्गीय संघटना, बहुजन पुरोगामी संघटना सज्ज आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...