आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत योजनेच्या कामासाठी पाणीपुरवठा विस्कळीत होणार, शासनाचा महापालिकेस आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून ७२ कोटी रुपये खर्चून कामे करण्यात येणार आहेत. विविध प्रकारची २८ कामे पूर्ण करण्याचा अादेश शासनाने महापालिकेस दिला अाहे. उत्सव काळात पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी महिन्यातून दोन वेळा शटडाऊन घेण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सभागृहाकडे सादर केला आहे.

 अमृत याेजनेतून जुना पुणे नाका ते नवीन पुणे नाकापर्यंतची पाइपलाइन बदलणे, पाकणी सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याचे बेड बदलणे, विद्युतीकरण करणे आदी २८ प्रकारची कामे हाती घेतली जाणार आहेत. यासाठी उजनी आणि टाकळी जलवाहिनी केंद्राचा पाणीपुरवठा सुमारे २४ ते ४८ तास महिन्यांतून दोन वेळा बंद करणे आवश्यक आहे. महिन्यातून दोन वेळा शहरात चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने महापालिका सभागृहापुढे ठेवला आहे. दरम्यान शहरातील विंधन विहीर, सौर ऊर्जावरील विंधन विहीर, हातपंप, टँकर व्यवस्थेसंदर्भात सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या दालनात सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे, उपअभियंता संजय धनशेट्टी, सिद्धप्पा उस्तरगे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

आयुक्त आल्यावर 
महिन्यातून दोनवेळा चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सभागृहापुढे आहे. त्यांच्याकडून निर्णय झाल्यावर अंमलबजावणी करू. अन्यथा महापालिका आयुक्तांना विचारून निर्णय घेऊ. 
- गंगाधर दुलंगे, प्र. सार्वजनिक आरोग्य अभियंता, मनपा 
बातम्या आणखी आहेत...