आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"वृक्ष जगवा, पेन्शन मिळवा' योजना प्रभावीपणे राबवणार, लाभ वाटपात गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- "वृक्षलावा, वृक्ष जगवा आणि पेन्शन मिळवा' योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून वृक्षांची जोपासना करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये ठराव पारित करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. १८) पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अॅड. धीरज पाटील होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अानंद रायते, उपाध्यक्ष सुधाकर गुंड, विषय समित्यांचे सभापती दत्तात्रय मोहिते, बाबूराव राठोड, हरिष डावरे, लता पवार आदींची उपस्थिती होती.

रायते यांनी वृक्षलागवडीच्या पेन्शन योजनेची माहिती सभेत सांगितली. याला सर्व सदस्यांनी मंजुरी दिली. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या ग्रामसभांमध्ये याची माहिती देऊन अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार झाडांची निवड करण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे. त्यांच्या मागणीनुसार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून झाडे लावण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. वृक्षांची जोपासना व्यवस्थितरित्या करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन वर्षांनंतर पेन्शन सुरू करण्यात येणार आहे. १४ व्या वित्त अायोगाच्या निधीतील दहा टक्के रक्कम या याेजनेसाठी राखून ठेवण्यात येणार आहे. तसेच राज्य केंद्र सरकार, जिल्हा परिषदेच्या स्व निधीतून पेन्शनसाठी रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या समन्वयातून संबंधित गावांनी प्रत्येक शेतकऱ्याची पेन्शची रक्कम ठरवायची आहे. त्यानुसार ३० वर्षे शेतकऱ्यांना पेन्शन मिळणार आहे.

कामानंतरनिविदा
अध्यक्षअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनातील कामांच्या अनियमिततेचा मुद्दा या सभेतही राष्ट्रवादीचे महेंद्र धुरगुडे यांनी उपस्थित केला. यावेळी काम केल्यानंतर निविदा प्रक्रिया केली जात असल्याचा आरोप केला. तेव्हा बांधकाम सभापती मोहिते यांनी दालनांची अवस्था दयनीय झाल्यामुळेच अगाेदर काम करून घेतल्याचे सांगितले. तेव्हा धुरगुडे यांनी अशी परवानगी ग्रामपंचायतींना देण्याची मागणी केली. त्यावेळी मोहिते निरूत्तर झाले. यावेळी अध्यक्ष पाटील यांनी विभागीय आयुक्तांच्या अादेशानुसार कारवाई होईल, असे सांगून वादावर पांघरुण घातले.

स्पर्धापरीक्षा केंद्र
किशोरीमेळाव्यामध्ये मुलींनी विविध मागण्यांसह स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यची मागणी केली. यामुहे रायते यांनी जिल्ह्यातील किशोरींना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेतला. यासाठी १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत अध्यक्ष अॅड. धीरज पाटील, सीईओ अानंद रायते यांनी सभागृहाला माहिती दिली. छाया: आरिफ शेख

एकाच गावात जादा शिलाई यंत्र वाटप केल्यामुळे जिल्हा परिषदेचा महिला बालकल्याण विभाग टीकेचे लक्ष्य बनला आहे. आता एकाच कुटुंबात अधिक लाभ देण्यामुळे हा विभाग आणखी चर्चेत आला आहे. तेर येथे एकाच कुटुंबात दोन सौरदीप, शिलाई यंत्रांचा लाभ दिला असल्याचे कीर्तीमाला खटावकर यांनी निदर्शनास आणले. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

तालुक्यात गाळे
उमरगा, तुळजापूर परंडा पंचायत समितीअंतर्गत गाळे बांधण्यासाठी मान्यता देण्यात आली. उमरगा येथे ३४, तुळजापूरला ४० तर परंडा येथे २० गाळे बांधण्यात येणार आहेत. यासाठी व्यापाऱ्याकडून आगाऊ रक्कम घेण्यात येणार आहे. वापराची मुदत पाच वरून दहा वर्षे करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यासाठी अंदोजपत्रक तयार केले आहे.

योजनेत अनियमितता
राष्ट्रीय पेयजल योजना, जलस्वराज, भारत निर्माण योजना आदी योजनांतून जिल्ह्यात ४० गावात कामे सुरू हाेती. यासाठी निधीही उचलण्यात आला आहे. मात्र, कामे अपूर्ण आहेत. यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याची मागणी भाजपचे कोळगे यांनी केली. यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे.

सभेतील अन्य ठराव
- ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त अायोगाचे १८ कोटी ३६ लाख रुपये वर्ग करण्यास मान्यता.
- चारा छावणी डेपो सुरू करण्याची शासनाला मागणी करणार.
- आगामी संचमान्यतेनुसार निमशिक्षकांना सेवेत सामावून घेणार.
- पाणीपुरवठा विभागासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याला मंजुरी.
- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या वार्षिक कृती आराखड्याला मंजुरी
- एमआरईजीएसमधूत तीन एेवजी एकाच शेतकऱ्यांना विहीर देण्याची शासनाला विनंती करणार.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कूपनलिका खोदण्याची मागणी वाढत आहे. यामुळे तेरच्या कीर्तीमाला खटावकर यांनी निधी उपलब्ध करण्याची मागणी केली. त्यावर अध्यक्षांनी तशी तरतूद केली असल्याचे सांगितले. काही दिवसातच कूपनलिकांसाठी निविदा काढण्यात येणार आहे. यावेळी दत्ता साळुंके यांनी पंचायत समितींमध्ये हातपंपाच्या दुरुस्तीसाठी अडवणूक होत असल्याचे निदर्शनास आणले. मागील थकबाकीवरून अडवणूक करण्याबाबत पंचायत समितीला आदेशित करणार असल्याचे रायते यांनी सांगितले.