आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रेचा वाद: सिद्धेश्वर यात्रेसंबंधी जिल्हाधिकारी यांच्या सर्वाधिकारावर न्यायालयाचे शिक्कामोर्तब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होम मैदानावर गड्डा यात्रेची तयारी सुरू झाली आहे. शुक्रवारी मौत का कुआची उभारणी सुरू होती. - Divya Marathi
होम मैदानावर गड्डा यात्रेची तयारी सुरू झाली आहे. शुक्रवारी मौत का कुआची उभारणी सुरू होती.
सोलापूर- जिल्हा प्रशासन आणि मंदिर समिती यांच्यातील वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी उच्च न्यायालयाने आपत्कालीन कायद्यानुसार तयार केलेला कृती आराखडा अंमलबजावणी करण्याचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी यांना तर पोलिस आयुक्तांनी नवीन आपत्कालीन रस्ता सुचवावा, असे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेश पाटील एस. एन. सोनक यांनी देत याचिका निकाली काढली. मात्र, निकालाची प्रत अद्याप प्रशासनाच्या हाती पडल्याने यात्रेबाबत पुढे काय होणार याचे चित्र स्पष्ट नाही. तर दुसरीकडे होम मैदानावरील यात्रेच्या तयारीची मंद गतीने सुरू होती.

सिद्धेश्वर यात्रा आपत्कालीन कायद्यानुसार करावी, या मागणीसाठी महेश गाडेकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, सिद्धेश्वर मंदिर समिती, जिल्हाधिकारी कार्यालय शासन यांनी बाजू मांडली. पाचही जणांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने आपत्कालीन कायद्यानुसार यात्रेचे नियोजन करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत, जिल्हाधिकारी यांनी तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार यात्रेचे नियोजन करावे, आपत्कालीन रस्त्याबाबत यात्रेतील संभाव्य गर्दीची स्थिती पाहून पोलिस आयुक्तांनी निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. शासनाच्या वतीने अभिनंदन वाग्याज्ञी तर याचिकाकर्ते यांच्या वतीने उमेश मानकापुरे, महापालिकेच्या वतीने रामदास सब्बन तर मंिदर समितीच्या वतीने अजित कुंभकोणी यांनी बाजू मांडली.
सव्वा तास झाली सुनावणी...
शुक्रवारी नरेश पाटील एस. एन. सोनक यांच्या खंडपीठासमोर सिद्धेश्वर यात्रेसंबंधी युक्तिवाद करण्यात आला. सव्वा अकरा वाजल्यापासून ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सर्वच वकिलांनी बाजू मांडली. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, महापालिका, मंदिर समिती शासन यांची बाजू ऐकून घेतली.
पुढे वाचा, हायकोर्टाच्या आदेशानंतर सोशल मीडियावर चर्चा...