आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वळसंग सूतगिरणी निवडणूक: सहा जागा बिनविरोध, ११ जागांसाठी १३ जण रिंगणात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण सोलापूर- वळसंग येथील स्वामी समर्थ सहकारी सूत गिरणीच्या सहा जागांची बिनविरोध निवड झाली तर ११ जागांसाठी १३ जण निवडणूक रिंगणात राहिले. गिरणीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार सिद्धाराम म्हेत्रे इतर नेत्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र दोघांनी अर्ज मागे घेण्यास नकार दिल्याने अखेर निवडणूक लागली.

सूतगिरणीच्या १७ जागांसाठी शंभरच्या घरात इच्छुकांचे अर्ज आले होते. बुधवारी (दि. १२) उमेदवारी माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. सूतगिरणीच्या सत्ताधारी पॅनेलमध्ये आपणालाच उमेदवारी मिळावी म्हणून कापूस उत्पादक गटातून शब्बीर कोरबू अनुसूचित जाती मतदारासंघातून बाळासाहेब नवगिरे यांचा आग्रह होता. मात्र, सत्ताधारी नेत्यांनी त्यांना पॅनेलमध्ये घेतले नाही. यामुळे दोन्ही मतदारसंघासाठी अखेर निवडणूक लागली. आमदार म्हेत्रे, उल्हास पाटील, संजीवकुमार पाटील, प्रकाश वाले, बंडाप्पा मुनाळे इतर मंडळी गिरणीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी धडपड करताना दिसले. कापूस उत्पादक गटातील १० जागांसाठी ११ जण तर अनुसूचित जातीसाठीच्या एका जागेसाठी दोघे िरंगणात राहिल्याने या दोन्ही मतदारसंघांसाठी निवडणूक लागली.
बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न निष्फळ
सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमदार म्हेत्रे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश हसापुरे, सिद्धेश्वर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी, बंडप्पा मुनाळे यांच्यासह इतर नेत्यांनी प्रयत्न केले. गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी वरील नेत्यांवर बिनविरोध निवडीची जबाबदारी टाकली होती. सर्वांनी बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न केले. आमदार म्हेत्रे निवडणूक कार्यालयात ठाण मांडून होते. परंतु त्यांनाही दोघा इच्छुकांना आपलेसे करण्यात यश आले नाही. परिणामी निवडणूक लागली.
रिंगणातील उमेदवार
कापूस उत्पादक मतदारसंघ : रमेश दुधनी, राजशेखर शिवदारे, बसवराज उण्णद, श्रीशैल वाले, गुरुनाथ पाटील, शंकर पाटील, प्रभाकर दिंडूरे, संजयकुमार डोंगरराजे, राजशेखर हिप्परगे, काशिनाथ कोळी शब्बीर कोरबू. अनुसूचित जाती मतदारसंघ : बाळासाहेब नवगिरे तम्मा निकंबे.
बिनविरोध निवडलेले संचालक मतदारसंघ
बसलिंगप्पा लागलगाव (इतर मागास प्रवर्ग), गुरनिंगाप्पा ख्याडे संजीवकुमार पाटील (बिगर कापूस उत्पादक गट), सोमनिंग व्हनमाने (भटक्या विमुक्त जमाती), अर्चना पाटील ताराबाई पाटील (महिला) हे संचालक बिनविरोध निवडले गेलेले आहेत.