आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेगाडीत बर्थसाठी दुमडता येणारी शिडी, एनआयडीची निर्मिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रेल्वेडब्यात वरचा बर्थ मिळाला तर चढून जाणे अनेक प्रवाशांसाठी तारेवरची कसत ठरते. विशेषत: ज्येष्ठ, महिला आणि लठ्ठ लोकांना डोकेदुखी ठरते. मात्र अशा प्रवाशांसाठी आता आनंदाची बातमी. रेल्वे प्रशासन खालच्या बर्थपासून वरच्या बर्थपर्यंत जाणारी एक शिडी तयार करत आहे. ज्याची सुरुवात खालच्या बर्थपासून होईल.

बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन या संस्थेने याचे डिझाइन तयार केले असून लवकरच त्याची अंमलबजावणी भारतीय रेल्वेत होणार आहे. तसेच प्रवासी वरच्या बर्थवर गेल्यानंतर ती शिडी दुमडता येणार आहे. मात्र हा बदल केवळ वातानुकूलित तृतीय श्रेणीच्या डब्यांसाठी असणार आहे.

शयनयान तृतीय श्रेणी वातानुकूलित दर्जाच्या डब्यात वरच्या बर्थवर जाण्यास मधल्या वरच्या बर्थमध्ये पायऱ्यांसारखी व्यवस्था केलेली आहे. मात्र यावरून वर जाणे उतरून खाली येणे थोडे त्रासदायक ठरते. रेल्वे प्रशासनाने यावर कोणता तरी उपाय करावा, अशी मागणी प्रवाशांतून होत असायची. यावर अखेर रेल्वे प्रशासनाने उपाय शोधला आहे. थ्री टायरच्या डब्यात जागेची कमतरता असल्याने काही बदल करणे खूप मुश्किलीचे होते. मात्र या अडचणीवर एनआयडीने मात केेली आहे. वरच्या बर्थवर जाणारी शिडी ही एका अर्थाने लवचिक असणार आहे. दोन पायऱ्यांमध्ये थोडेच अंतर असणार आहे. त्यामुळे वर चढणे आणि उतरणे हे त्रासदायक ठरणार नाही. भारतीय रेल्वे एनआयडी यांच्यात करार झाला असून लवकरच यावर काम सुरू केले जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा बदल जरी वातानुकूलित तृतीय श्रेणीसाठी असला तरीही नंतर मात्र हा बदल शयनयानला लागू केला जाईल. देशातील सर्वच रेल्वेत हा बदल लागू केला जाणार आहे.

प्रवाशांना लाभ होईल
वरच्याबर्थवरजाण्यास रेल्वेत आता शिडी वापरली जाणार आहे. बंगळुरू येथील संस्थेकडून याचे काम केले जाईल. यामुळे प्रवाशांना फायदाच होणार आहे.” के. जयशंकर, उपमुख्यवाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, मुंबई