आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंकराने प्रसन्न होऊन कण्णप्पांना दिले उजव्या बाजूला स्थान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाशिवरात्री विशेष 
बेडरसमाजाचे आराध्य दैवत शिवभक्त बेडर कण्णप्पा यांचा उत्सव समाजबांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्या निमित्ताने बेडर कण्णप्पा यांची श्री शंकरावर असलेली अलोट भक्ती, श्रद्धा याचे दर्शन घडवणारी गाथा. 

तेलुगूत तिन्ननर तर कानडीत कण्णप्पा ब्याडर कण्णप्पा असे दुहेरी संबोधले जाते. त्याचा जन्म उडूप्पूर चालू नाव उत्तूकूर या गावी दक्षिण भारत येथील राजा नागन जो व्याध (शिकारी) समुदायाचा राजा होता, त्या ठिकाणी झाला. राजा नागन शिकारीत तरबेज होता. त्यांच्या बरोबर वडिलांच्या आज्ञेनुसार बेडर कण्णप्पा त्याचे सहकारी मित्र शिकार करण्यास जंगलात गेले होते. थकलेले सहकारी बेडर कण्णप्पा शिकार करून प्राण्याचे शव कालहस्ती डोंगराकडे घेऊन जात होते. त्यावेळी त्याचा एक सहकारी बेडर कण्णप्पाला म्हणाला, या कालहस्ती डोंगरात एक देऊळ आहे. त्यातील देवाचे तू दर्शन घे. देवाचे दर्शन घेण्याकरिता बेडर कण्णप्पा चढून जात असताना देवळाच्या जवळ गेल्यानंतर तो पूर्णत: पूर्वीचा प्रचंड शीण (थकवा) विसरून गेला. तो उत्साहाने देवाचे दर्शन घेण्याकरिता आतूर झाला. देवळाच्या समीप गेल्यानंतर त्याचा उत्साह आनंदाने उल्हासाने भरून गेला. सरतेशेवटी ज्यावेळी देवळातील शिवलिंग त्याच्या दृष्टीस पडले, त्यावेळेस तर तो भानच हरपला. त्या हरपलेल्या भानात तो एवढा आनंदित झाला की, अत्यानंदाने त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. 

एकेदिवशी त्या देवळाचा पुजारी शिवकाशीयर याला स्वप्न पडून त्याच्या स्वप्नात देव म्हणाले, मला माहीत आहे बेडर कण्णप्पा हा फारच विचित्र पद्धतीने माझी पूजा करतो. ते किळसवाणे वाटते. हे मला मान्य आहे. तरीपण बेडर कण्णप्पा ज्या पद्धतीने पूजा करतो ती पूजा मला अतिशय प्रिय आहे. तू असं कर की, तू दुसऱ्या दिवशी देवळात येऊन माझ्या मूर्तीमागे लपून उभे राहा बेडर कण्णप्पा कसा पूजा करतो ते तू पाहा. बेडर कण्णप्पा दुसऱ्या दिवशी पूजेकरिता देवळात नेहमीप्रमाणे आला आणि आधीची सजावट बाजूला सारून नेहमीप्रमाणे शिवशंकराची पूजा केली. शिवकाशीयर हा पुजारी हे सर्व काही पाहात होता. पूजेनंतर त्याने आपला एक डोळा, पायाचा अंगठा देवास अर्पण केला. ताबडतोब देव शिवशंकर मूर्तीमधून बेडर कण्णप्पासमोर प्रगट झाले कण्णप्पाला दुसरा डोळा काढण्यापासून दूर केले. 
 
बेडर समाजाचे आराध्य दैवत शिवभक्त कण्णप्पा 
परमेश्वरप्रगट होताच बेडर कण्णप्पा मंदिरात लपून बसलेला पुजारी हे दोघे जण परमेश्वराच्या पायावर पडले. तेव्हा परमेश्वराने दोघांना आशीर्वाद दिले. अशाप्रकारे बेडर कण्णप्पाला प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिला. तुझे नाव तिन्ननर आहे. आता तू कण्णप्पा म्हणून ओळखला जाशील आणि यापुढे तुझी मूर्ती एक माझा महान भक्त म्हणून उजव्या बाजूला असेल. श्रीकालाहस्ती मंदिर आंध्र प्रदेशाचे कालाहस्ती शहरामध्ये स्थापित आहे. अशा तऱ्हेने बेडर कण्णप्पा हा दक्षिण भारतातील एक महान शिवभक्त म्हणून गणला जाऊ लागला. 
 
बातम्या आणखी आहेत...