आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेशनवर तूरडाळ मिळेल १०३ रुपये किलो दराने, शहर-जिल्ह्यासाठी ३१० टन तूरडाळीची गरज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- २०० रुपये किलोवर पोहोचलेली तूरडाळ शासनाने जाहीर केल्याप्रमाणे सोमवारपासून रास्त भाव दुकानातून १०३ रुपये प्रती किलोप्रमाणे वितरित केली जाणार आहे. जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून वाटपाचे नियोजन केले असून दुकानांकडून लवकरच उचल सुरू होणार आहे. अंत्योदय बीपीलएलधारकांना प्रति कुटुंब एक किलो डाळ दिली जाणार आहे. शहरासाठी ३० टन तर ग्रामीणसाठी २८० टन डाळ लागणार असून शहरासाठी ग्रामीणमध्ये काही तालुक्यांना मंगळवारपर्यंत धान्य उपलब्ध झाले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली तूरडाळ अंत्योदय बीपीएल कुटंुबांना वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीणमध्ये अंत्योदयचे ७७ हजार ८०८ तर बीपीएलचे लाख हजार १५९ शिधापत्रिकाधारक आहेत. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना टन तर बीपीएल धारकांना २२ टन तूरडाळ वाटप करण्यात येणार आहे. शहरातील अंत्योदय बीपीएल कुटुंबासाठी ३० टन धान्य वितरित करण्यात येणार आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे स्वस्त धान्य दुकानातून प्रत्यक्षात तूरडाळ वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

कोटी १८ लाख रुपयांचा खर्च...
शहर, जिल्ह्यास ३१०० क्विंटल तूरडाळ पुरवठा करण्यासाठी पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व शासकीय गोदामापर्यंत हमाली, चढाई, उतार इतर खर्च मिळून प्रती क्विंटल १० हजार १८५ रुपये दराने खरेदी केली आहे. साधारणत: ३१० टन डाळीसाठी शासनाला कोटी १८ लाख ६८ हजार रुपयांचा खर्च येणार आहे.

सोमवारपासून वाटप
तूरडाळवाटपाचेनियोजन करण्यात आले आहे. ग्रामीणमध्ये काही ठिकाणी डाळ उपलब्ध झाली नाही. शहराला ३० टन डाळ मिळाली आहे. सोमवारपासून धान्य वितरित करण्याचे नियोजनआहे. दिनेशभालेदार, जिल्हा पुरवठा अधिकारी.
बातम्या आणखी आहेत...