Home »Maharashtra »Western Maharashtra »Solapur» News About ST Bus Accident For Solapur

सोलापूर: चालकाच्या चुकीने दुभाजकावर एसटी, एकूण 14 प्रवासी जखमी

प्रतिनिधी | Apr 21, 2017, 09:47 AM IST

  • सोलापूर: चालकाच्या चुकीने दुभाजकावर एसटी, एकूण 14 प्रवासी जखमी
सोलापूर -सोलापूरते मुरुम जाणारी एसटी बसचालकाच्या चुकीमुळे थेट दुभाजकावर चढली. यात १४ प्रवासी जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सोलापूर बस स्थानकाच्या समोर घडली.
दरम्यान, एसटी प्रशासनाने घटनेच्या चौकशीचा अादेश दिला अाहे. तसेच जखमी प्रवाशांवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार करून त्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात आली.
सोलापूरहून मुरुमला जाण्यासाठी सकाळी सोलापूर बस स्थानकावरून एसटी निघाली. बस स्थानकाच्या समाेर असलेल्या दुभाजका समोर थेट एसटी चढली. काही कळायच्या आतच हे घडले असल्याने प्रवासी भांबावललेल्या स्थितीत होते. एसटीतील १४ प्रवाशांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या. त्यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचार देण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना आर्थिक मदत मिळावी, या हेतूने एसटीचा पी फॉर्म देखील देण्यात आला.
घटनेची गंभीर दखल सोलापूर एसटी प्रशासनाने घेतली असून गाडीत बिघाड होता का की चालकांची चूक होती हे स्पष्ट होण्यासाठी चौकशी समितीची स्थापना करण्यात आली. एक महिन्यात चौकशी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
चालकाचा स्टेअरिंग वरचा ताबा
- स्टेअरिंगवरचा ताबा सुटल्यानेच ही घटना घडली असे प्रथमदर्शींनी वाटते. घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल.
” श्रीनिवासजोशी, विभाग नियंत्रक, सोलापूर
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended