आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: बेकायदा दारूवर कारवाईचे केवळ नाट्य, कागदावर रंगवले जाते दारूबंदी मोहीम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने शहर जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायावर छापा टाकला जातो. मुद्देमाल जप्त करून शासनाची तिजोरी भरली जाते आणि कारवाईच्या नोंदवहीमध्ये स्वत:चे क्रेडिट कमवले जाते. इतर शहरात ज्या प्रकारे प्रबळ इच्छाशक्तीने दारूबंदी पूर्णपणे बंद केली जाते तशी दारूबंदी सोलापुरात का केली जात नाही, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. याला प्रशासन आणि शासन हे दोघेही जबाबदार असल्याचे दिसून येते. 
 
दारू उत्पादनावर लक्ष ठेवणे बेकायदा दारू विक्री, वाहतूक, बनावट मद्यनिर्मिती रोखण्याची तसेच कारवाई करण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यवाहतूक वा विक्री करणारी वाहने, हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे रसायन साहित्य, स्पिरीट आदी बाबींवर कारवाई केली जाते. परंतु प्रत्यक्षात आजही शहरात बनावट दारू, हातभट्टीची सर्रासपणे विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. 
 
हातभट्टीदारू अड्डे उद्धवस्त पण फलित काय? 
हद्दवाढआणि ग्रामीण भागातील हातभट्टी दारू अड्डे उद्धवस्त केले जातात. ही कारवाई स्तुत्य आहे. अशा अड्डे मालकांवर खाकीचा जरब का नाही. एकदा अड्डे उद्धवस्त केले की पुन्हा उभारू नये, असा खाकीचा धाक पाहिजे. सकाळी अड्डे उद्धवस्त केल्यानंतर सायंकाळी पुन्हा हे अड्डे उभारले जातात. यातून “तू रडल्यासारखे कर अन मी पुसल्यासारखे करतो,’ असेच चित्र दिसून येते. 

बेकायदा दारू विक्रीचे काय? 
शहरातीलपूर्व भाग, जुने विडी घरकुल, बुधवार पेठ, कस्तुरबा मंडई, नवे विडी घरकुल, औद्योगिक वसाहत आदी भागात अनेक बिअर शॉपी वाइन मार्ट आहेत. पण हे केवळ नावाला असून या दुकानांच्या बाजूला एव्हाना आतच दारू पिण्याची सोय करण्यात आलेली असते. ही बाब कुणालाच माहीत नाही, असे नाही. पण मांजराला असे वाटते की, मी दूध पिताना कोणाला दिसत नाही. अशा गोष्टींवर कारवाई झाल्याचे अजूनपर्यंत निदर्शनास आलेले नाही. ड्राय डे म्हणजे दारू विक्री दुकाने बंद असताना केली जाणारी छुप्या पद्धतीची दारू विक्री, रात्री १० वाजता वाइन शॉप ११ नंतर बिअर बार, परमिट रुम बंद झाल्यावर ब्लॅकने होणारी दारू विक्री याकडे पाहणार कोण? अशा बातम्या दैनिकात छापून आल्यावर लगेच दोनतीन कारवाया होतात. नंतर कायमस्वरुपी ते चरायचे कुरण ठरते, अशा प्रतिक्रिया जनसामान्यांतून येतात. 
 
- २०१५ -१६ या वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहर- जिल्ह्यात टाकलेल्या छाप्यात कोटी ८५ लाख रुपये 
- २०१६ - १७ या चालू वर्षात कोटी ९९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
- २०१५ - १६ मध्ये हजार ३२ तर २०१६ - १७ मध्ये हजार ३०२ आरोपींचा समावेश आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, वर्षभरातील कारवाई...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...