आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवत्तेचा सर्वोत्तम ध्यास हवा, पारितोषिक वितरण प्रसंगी प्रा. पाटील यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गुणवत्तेचा सर्वोत्तम ध्यास घेतल्यास स्पर्धेत टिकता येईल, मात्र त्यासाठी युवकांनी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, राज्य नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. जे.एफ. पाटील यांनी आज येथे केले. 
 
‘संगमेश्वर’चा ६४ वा शैक्षणिक गुणवत्ता पारिताेषिक वितरण समारंभ सायंकाळी झाला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पाटील मार्गदर्शन करीत होते. यावेळी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष , माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, सचिव धर्मराज काडादी, व्यवस्थापन समिती सदस्य पुष्पराज काडादी, प्रा. बी.व्ही.पाटील, ए. जी. पाटील , प्राचार्य डडॉ. डी. डी. पुजारी, उपप्राचार्य ए. के. हुली, विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी श्रद्धा कुलकर्णी उपस्थित होते. १७२ विद्यार्थ्यांना पारितोषिकाने गौरविण्यात आले. 
 
डॉ. पाटील म्हणाले, शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना यश -अपयश यांना सामोरे जावे लागते. मात्र अशा संघर्षपूर्ण स्थितीत त्याग करण्याची तयारी करावी लागते. हिमालयाच्या शिखराकडे बघितल्यानंतर जे वाटते ते एक्सलंट असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जीवनात अशी सर्वोत्कृष्टता जपावी. 
 
प्रारंभी आदिती बोराळकर, केतकी रानडे, केतकी रानडे यांनी स्वागतगीत गायले. पाहुण्यांचा परिचय डॉ. सारीपुत्र तुपेरे यांनी करून दिला. वार्षिक अहवालाचे वाचन प्राचार्य डॉ. डी. डी. पुजारी यांनी केले. पारितोषिक यादीवाचन प्रा. प्रसाद कुंटे, प्रा. आरती दिवटे यांनी केले. 
 
कनिष्ठ वरिष्ठ विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. प्रा. डॉ. दादादासाहेब खांडेकर, डॉ. उषा जमादार यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी प्रतिनिधी श्रद्धा कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमास माजी प्र. प्राचार्य नरेश बदनोरे, कोनापुरे, बाकळे, आर. एस. पाटील, संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका गायत्री कुलकर्णी, उपप्राचार्य कुलकर्णी, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...