आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उसाचा दर जाहीर करण्यावर कारखानदार ठाम; जिल्ह्यात आंदोलनाची व्याप्ती वाढू लागली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ऊस दरवाढीचा प्रश्न सोडवणाऱ्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची पांढरी गाडी काळी करू, असा इशारा देऊन शेतकरी संघटनेने अांदोलनाची व्याप्ती वाढवली अाहे. सोमवारी कारखानदारांनी अनगरमधील बैठकीत दर जाहीर करणार नाही, असा पवित्रा घेतला अाणि तसे पालकमंत्र्यांना सांगितले. सायंकाळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी घेतलेली बैठक चर्चेचे गुऱ्हाळच ठरली. मंगळवारी खासदार राजू शेट्टी जिल्ह्यात येत अाहेत. त्यामुळे त्यातून काय निष्पण्ण होते, याकडे लक्ष लागले अाहे. पंढरपुरातील अांदोलक शेतकऱ्यांची तब्येत बिघडल्याने वातावरण अाणखी गंभीर बनले अाहे. 


ऊसदराचा तिढा सुटावा म्हणून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शासकीय विश्रामगृहात सोमवारी दुपारी रयत क्रांती, मनसे, स्वाभिमानी या शेतकरी संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा केली. पण ती बैठक केवळ अौपचारिकताच ठरली. 


कारखानदारमाजी अामदार िदलीप माने, संजय शिंदे तर शेतकरी संघटनांचे दीपक भोसले, महामूद पटेल, संजय पाटील घाटणेकर, दिलीप धोत्रे अादींची उपस्थिती होती. कारखानदार अाणि शेतकरी संघटनेचे नेते खासगीत गटा-गटाने चर्चा करीत होते. चर्चेनंतर बाहेर अालेल्यांमध्ये अांदोलन तीव्र करण्याच्या भाषेत मवाळपणा जाणवत होता. तोडगा काढण्यासाठी हे वेगळे प्रयत्न सुरूच होते. 


कारखानदार नेत्यांची अनगरमध्ये बैठक 
अनगर येथे सोमवारी दुपारी साखर कारखानदार नेत्यांची बैठक झाली. त्यात दर जाहीर करण्याचाच निर्णय झाला. या संदर्भात बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सांिगतले की, कारखान्याचे ताळेबंदपत्रक पाहूनच दर ठरवावा लागतो. अाजच दर जाहीर केला तर कारखाने अडचणीत येऊन बंद पडतील. त्यामुळे दर जाहीर करणार नाही. िनयमाप्रमाणे एफअारपी द्यायला तयार अाहोतच. ही अामच्यातील चर्चा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कानावर टाकली अाहे. माजी अामदार िदलीप माने िजल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे हे त्यासाठी पालकमंत्र्यांना भेटले. 


लोकमंगल कारखान्याच्या गव्हाणीत ठिय्या 
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथील लोकमंगल कारखान्याच्या गव्हाणीत आंदोलक शेतकऱ्यांनी ठिय्या मांडल्याने गाळप थांबले आहे. कारखाना प्रशासनाने दर जाहीर होईपर्यंत गाळप बंद ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतरच आंदोलक शेतकरी गव्हाणीच्या बाहेर आले. 


आंदोलनाची धग कायम 
पंढरपूर तालुक्यातील अांदोलक शेतकरी समाधान फाटे, नवनाथ माने, चंद्रकांत बागल यांची तब्येत बिघडली आहे. पंढरपूर तालुक्यात सोमवारीही (दि. २०) ऊसदर आंदोलनाची धार तीव्र राहिली. अनेक गावांत शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी कोर्टी, उंबरे येथे ऊस वाहतुकीच्या ट्रक, ट्रॅक्टरचे टायर फोडले. बाजीराव विहीर येथील बेमुदत उपोषण सुरूच आहे. 


यंदा सुधाकर परिचारक गप्पच 
दरवेळीउसाचा दर सुरुवातीलाच जाहीर करणारे पंढरपूरचे माजी अामदार सुधाकर परिचारक हे या वर्षी मात्र गप्पच आहेत. दर जाहीर करण्याचे धोरण त्यांनीही यावर्षी घेतले अाहे. या संदर्भात पंढरपुरात बाजीराव विहिरीजवळील अांदोलक शेतकऱ्यांनी त्यांना विचारणा केली. त्यावेळी परिचारक म्हणाले की, मी दर जाहीर केले की टीका टिपण्णी करतात, पंतांना काय कळतेय, असे म्हणतात. 

बातम्या आणखी आहेत...