आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीची गळफास घेऊन कारागृहामध्ये आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
उस्मानाबाद - न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या बंदीने जिल्हा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी (दि.८) दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान उघडकीस आला. 
 
हनुमंत उर्फ बाळा सदाशिव ढेकणे (२५, रा. गौडगाव, बावी, ता. उस्मानाबाद) यांनी कारागृहातील स्वच्छतागृहाच्या खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली. हनुमंतने गळफास घेण्यासाठी अंग पुसण्यासाठी असलेला गमजा वापरला. हनुमंतवर ढोकी पोलिस ठाण्यात हाणामारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्याराने वार केल्याचा आरोप असल्यामुळे न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. वैफल्यग्रस्त झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. कारागृह अधीक्षक एस. सी. भगुरे यांच्या माहितीवरून आनंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. 
बातम्या आणखी आहेत...