आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरमध्ये तीन दिवसांपूर्वीच नोकरीस लागलेल्या शिक्षकाची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तीन दिवसांपूर्वी शिक्षक म्हणून नोकरीला लागला. वडीलही त्याच शाळेत प्राचार्य. उच्च शिक्षित कुटुंब. पण त्याने गळफास घेतला. शनिवारी सायंकाळी सैफुल परिसरात ही घटना घडली. संजय मल्लेशी बिडवे (वय २६, रा. कांचनगंगानगर, विजापूर रोड) असे मृताचे नाव अाहे.
 
संजय हे निंबर्गी येथील ज्यु. काॅलेजात गुरुवारी रुजू झाले होते. शनिवारी सकाळी कॉलेजला जाऊन घरी अाले. खालच्या मजल्यात नातेवाईक बसले होते. वरच्या मजल्यावर जाऊन त्यांनी गळफास घेतला. विजापूर नाका पोलिसांत याबाबत नोंद घेण्यात अाली. घटनेचे कारण समोर अाले नाही. 
बातम्या आणखी आहेत...