आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाचा उन्हाळा अधिक कडक होण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर -  यंदाच्या वर्षी उन्हाळ्याची दाहकता जाणवणार असून, सोलापुरात तापमान प्रत्येक वर्षीपेक्षा वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आठवड्यापासून ३६ ते ३८.९ सेल्सियसच्या दरम्यान तापमान राहिले आहे. उन्हाळ्यात तपमान ४३ अंशांवर जाईल. त्यामुळे शहरवासीयांना यापेक्षा अधिक दाहकतेचा सामना करावा लागणार आहे. 
शहरात उन्हाचा चटका वाढला असून, बहुतांशी जिल्ह्यातही तापमान वाढू लागले आहे. रविवारी तापमानात घट झाल्याने थंडी जाणवत होती. मंगळवारी सोलापुरात ३७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आर्द्रतेचे प्रमाण १० टक्के इतके होते. 

शहरातील वातावरणातही मोठ्या प्रमाणात बदल झाला असून, तापमानही झपाट्याने वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारी रस्त्यावरची गर्दी तुरळक होऊ लागली आहे. त्याच बरोबर चौका-चौकातील गाड्यांवर शीतपेये, उसाचा रस, ज्यूस यासाठी गर्दी होत आहे. दुपारी कामासाठी बाहेर पडणारा प्रत्येकजण चेहऱ्याला रूमाल स्कार्फ बांधूनच बाहेर पडत होता. 

थंडावा देणारे पदार्थ खा 
^सोलापुरात उष्णतेची दाहकता भयावह असते. त्यामुळे शरीराचे तापमान व्यवस्थित राखण्यासाठी जास्तीत जास्त स्वच्छ पाणी प्यावे. आहारात शरीराला थंडावा देणारे पदार्थ खावेत. विविध प्रकारचे ज्यूस प्यावेत. डोक्याच्या संरक्षणासाठी रुमाल अथवा टोपी असावी. डॉ.विठ्ठल धडके, फिजिशियन, सिव्हिल हाॅस्पिटल 

उष्णता कमी करण्यासाठी काही उपाय ... 
उन्हाळ्यातलिंबू पाणी प्यावे. रोजच्या आहारात ताज्या, ताकाचा समावेश असावा. थंड केलेल्या दुधात गुलकंद मिक्स करून रात्री झोपताना आणि सकाळी रिकाम्यापोटी प्यावे. हाताला, पायाला, डोक्याला, चेहऱ्याला सगळीकडे कोरफडीचा गर (जेल नाही ताजा गर) लावावा. धणे पाण्यात टाकून ते पाणी गाळून सेवन केल्यासशरीरातील उष्णता कमी होते. उन्हाळ्यात नाकातून रक्तस्राव होत असल्यास नाकावर बर्फ फिरवावा. उन्हाळ्यात चेहरा जास्तीत जास्त वेळा थंडपाण्याने धुवावा. रात्री झोपताना साजुक तुपाचे दोन थेंब नाकात टाकावेत. 

उत्तर भारतात बर्फ पडला की... 
^यंदाच्या वर्षीकडक उन्हाळा असून, ४३ अंशहून अधिक तापमान वाढेल. तापमान कमी जास्त होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. उत्तर भारतात बर्फ पडला की आपल्या भागात थंडी जाणवते.” डॉ.जयवंत जाधव, हवामान तज्ज्ञ 
 
बातम्या आणखी आहेत...