आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब! पारा ४३.७ वर, उन्हाळ्यात लहान मुलांची घ्या काळजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूरला कमाल तापमानाने शुक्रवारी आतापर्यंतची कमाल गाठली. पारा तब्बल ४३.७ अंश सेल्सिअसवर होता. राज्यात सर्वत्र तापमानवाढ झाल्याचे दिसून येत आहे. तापलेल्या शहरात सोलापूरचा क्रमांक तिसरा होता. उष्ण हवेमुळे ज्येष्ठांना मुलांना जास्त त्रास जाणवला.
नागपूरचे कमाल तापमान ४४.२ हे उच्चांकी आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी मालेगाव अकोला ४४ अंश सेल्सियस नोंद झाली. काल गुुरुवारी सोलापुरात ४३.१ एवढी नोंद झाली. शुक्रवारी ०.६ अंशांनी वाढ झाली.

कडाक्यामुळे उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत होत्या. घरात उकाडाही खूप जाणवत होत्या. रात्रीदेखील उष्णतेच्या तीव्रतेची जाणीव होत होती. त्यामुळे दुपारी १२ ते यावेळेत नागरिकांनी बाहेर पडणे टाळले. उष्णता जास्त असल्याने दुपारच्या वेळेस बाजारपेठेत रस्ते रिकामे दिसत होते. कोणी कामासाठी बाहेर पडत होते. त्यांनी उन्हापासून संरक्षण देणारी टोपी, स्कार्फ, पांढरा रुमाल, चष्मा, हातमोजे आदी साहित्यांचा वापर करताना दिसून आले. पुणे हवामान िवभागाने आणखी दोन अंशांने तापमान वाढेल, असा अंदाज वर्तवला आहे. पुणे हवामान विभागाचे संकेतस्थळ तांत्रिक अडचणीमुळे अपडेट नव्हते. रात्री उशिरापर्यंत दुरुस्ती करण्याचे काम सुरू होते. दुरुस्ती झाल्यानंतर अपडेट टाकण्यात येतील, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

पारा आणखी वाढेल
ढगनाहीत.त्यामुळे तापमानात वाढ होईल . त्यामुळे सोलापूरचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे.” डॉ. पी. सी. एस. राव, हवामानिवभाग, पुणे