आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम परवाना न घेताच बांधला जलतरण तलाव, अनेक त्रुटींमुळे उद्घाटन रखडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जुळे सोलापूरकरांच्या सोयीसाठी बांधलेला सरकारी जलतरण तलाव महापालिकेकडून बांधकाम परवाना घेताच पूर्ण केले आहे. ही धक्कादायक माहिती महापालिकेने दिलेल्या लेखी उत्तरात समोर अाली अाहे. सरकारी खाचत्याचेच काम बेकायदा पध्दतीने झाले अाहे.
 
त्यातच तलावातील फरशा तुटल्या, जलवाहिनी टाकण्याचे काम अर्धवट आदी अनेक कारणाने तलावाचे काम कधी पूर्ण होणार अन् ते सुरू होणार का? या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले अाहे. 
परिसरात अनेक निवासस्थाने अाहेत. त्यांची एनअोसीही घेतली गेली नसल्याने नव्याने बांधकाम परवान्याची फाइल तयार झाल्याची माहिती समोर अाली अाहे. 

सुमारे कोटी ६० लाख रुपये खर्चून हे जलतरण तलाव उभारले जात अाहे. जवळपास काम पूर्ण झाले होते. पंधरा दिवसापूर्वी तलावात पाणीही सोडण्यात अाले होते. पण नंतर ते जवळपास २२ ते २५ लाख लिटर पाणी सोडून देण्यात अाले. ते पाणी ड्रेेनेजमधून वाया गेले अाहे. नंतर तेथील फरशा तडकल्याचे उघड झाले. अाता फरशाचे काम सुरू अाहे. पण तेही अाता कधी होणार?, बांधकाम परवाना घेतल्याने पुढे काय कारवाई होणार? असे अनेक प्रश्न अाता उपस्थित झाले अाहेत. 
 
नागरिक शेखर फंड यांनी माहिती अधिकारात जलतरण तलावासाठी बांधकाम परवानगी घेतली अाहे का? असा प्रश्न विचारला होता, त्यावर महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाकडून उत्तर दिले असून सदर ठिकाणी परवानगी देण्यात अाल्याचे दिसून अालेले नाही, असे म्हटले अाहे. 
 
परवानगी घेण्याची प्रवृत्ती 
शासनाच्या प्रकल्पाची शहरात उभारणी करताना महापालिकेची परवानगी घेणे कायद्याने अावश्यक अाहे. पण शासनाचे संबंधित विभाग अाम्ही सक्षम अाहोत असे सांगून महापालिकेची परवानगी घेत नाहीत, असे प्रकार वारंवार घडताहेत. तेच या जलतरण तलावाबाबत घडले अाहे. पण बांधकाम परवानगी घेतल्याने पार्किंग, साई मार्जिन अन्य सार्जनिक सुविधांसाठीचे विषय बाजूला पडतात. 
 
महापालिकाही गप्पच 
बांधकामपरवानगी घेतल्याने बेकायदा म्हणून अनेक बांधकामे पाडण्यासाठी पुढाकार घेणा-या महपालिकेला शासनाच्या बांधकामांवर परवानगी नसतानाही कारवाई केली जात नाही. महापालिका त्याकडे डोळेझाक करते. 
 
बांधकाम परवानगी फाइल आली नाही 
जलतरणतलाव बाबतबांधकाम परवानगी फाईल मनपाकडे आले नाही. शासनाचे असल्याने क्रीडा विभागाने बांधकाम परवानगी घेतली नसेल. याबाबत फाईल आवक झाली का? हे गुरुवारी पाहतो.”
- लक्ष्मण चलवादी, प्रभारी नगर अभियंता, महापालिका 
 
काम करण्यापूर्वी काळजी घेतली नाही 
जलतरण तलावाचे काम करताना काळजी घेतली गेली नाही. पाण्याचा महत्वाचा विषयच अाता तलाव पूर्ण झाल्यानंतर मार्गी लावला जात अाहे. तलावात साठलेले पाणी लिकेज होऊन वाया गेले. बांधकाम परवाना घेतला गेलना नाही. अनेक त्रुटी राहिल्या अाहेत.
 
त्यामुळे मी महापालिकेला माहिती अधिकारात माहिती विचारली तर मनपाने बांधकाम परवाना घेतला नाही, एवढेच त्रोटक उत्तर दिले. तर तलावाची सविस्तर माहिती क्रिडा कार्यालयाला मागितली तर क्रीडाधिकाऱ्यांनीही ५० बाय २१ मीटरमध्ये जलतरण तलावाचे काम झाल्याचे लेखी उत्तर दिले. तेही त्रोटक अाहे. सविस्तर उत्तर देण्याचे टाळले जात अाहे. 
- शेखर फंड, नागरिक 
 
 
बातम्या आणखी आहेत...