आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाकणे खून प्रकरण: चौघांना पोलिस कोठडी, आणखी पाच जण गायब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तरुणाचा खून केल्याप्रकरणी अटकेतील आणखी चार संशयित आरोपींना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी १२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली.

बुधवारी (दि. ६) रात्री साडेआठच्या सुमारास येथील भादुले चौकात सोमनाथ टाकणे याचा खून करण्यात आला. याप्रकरणी मुलीचे वडील माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी पृथ्वीराज भोसले, शैलेश उर्फ शैलेंद्र भोसले, प्रसाद भोसले, प्रवीण भोसले या चार जणांना गुरुवारी न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. उर्वरित संदीप भोसले, अभय शहाजी भोसले, दिनेश प्रकाश भोसले, नीलेश भोसले यांना शुक्रवारी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग एक यांच्या न्यायालयात उभे करण्यात आले. पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यापैकी वैभव भोसले, विश्वजित भोसले, किरण भोसले, नागेश भोसले, विशाल भोसले हे पाच संशयित आरोपी गायब आहेत.