आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमअायएमचे नगरसेवक तौफिक शेख यांना अटक, हारुण सय्यद गटाबरोबर हाणामारी प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांना रविवारी अटक झाली. सायंकाळी सहाच्या सुमारास पुणे महामार्गावरील केगावजवळील सुनील हॉटेलजवळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हारुण सय्यद तौफिक शेख यांच्या गटात गेल्या रविवारी नई जिंदगीत निवडणूक प्रचारादरम्यान हाणामारी झाली होती. यानंतर सय्यद सगरी यांच्या घरावर दगडफेक झाल्यामुळे विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. शेख त्यांचा मुलगा अदनान यांच्या अटकपूर्व जामिनावर न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. 
 
सोमवारी (ता.२०) एमअायएमच्या १६ तर राष्ट्रवादीच्या नऊ अशा २५ जणांना पोलिस कोठडी मिळाली होती. त्यांना गुरुवारी (ता. २३ रोजी) जामीन मिळाला होता. नगरसेवक शेख त्यांचा मुलगा अदनान या दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर सोमवारी सुनावणी होती. केगावजवळील हाॅटेल सुनीलजवळ जेवण्यासाठी शेख हे अाले होते. त्यावेळी विजापूर नाका पोलिसांनी शेख यांना ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती, पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांनी दिली. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल. ताैफिक शेख राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हारुण सय्यद यांच्यात राजकीय वैमनस्य अाहे. १९ रोजी दोन्ही पक्षांची पदयात्रा नई जिंदगी, अमन हाॅटेल चौकातून जात होती. त्यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले. काठीने हाणामारी झाल्यामुळे हारुण सय्यदसह जण जखमी झाले होते. यानंतर सय्यद यांच्या भावाच्या घरावर तर शेख यांच्या समर्थकाच्या घरावर दगडफेक केल्यामुळे विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल अाहे. हाणामारीचा गुन्हा एमअायडीसी तर विजापूर नाका पोलिसात दगडफेकीचा गुन्हा दाखल अाहे. शेख गटातर्फे शाकीर सगरी तर सय्यद गटातर्फे अायुब सय्यद यांनी तक्रार दिली अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...