आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी आणि शिक्षक, शेतकऱ्यांनी काढला मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आर्थिक आणीबाणी म्हणता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वसामान्य जनता बँकिंगबाबत भयभीत, चिंताग्रस्त झाली आहे. मात्र एक महिन्यानंतरही कोणताही दिलासा सर्वसामान्यांना मिळू शकलेला नाही. सहकारी बँका या सर्वसामान्यांच्या बँका असतानाही या बँकांना नोटा स्वीकारण्यावर बंदी करून दुजाभाव झाला. रिझर्व्ह बँक ही केंद्र सरकारच्या हातातील बाहुले बनले आहे, अशी टीका डीसीसीचे चेअरमन राजन पाटील यांनी जाहीर सभेत केली.
नोटबंदी निर्णयानंतर सहकार क्षेत्रातील बँकांवर नोटा स्वीकारण्यास घातलेल्या बंदीच्या निषेधार्थ जिल्हा सहकारी बँक कर्मचारी, शिक्षक शेतकरी यांच्या सहभागासह शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात चेअरमन राजन पाटील, संचालक दिलीप माने, चंद्रकांत देशमुख, सभापती मकरंद निंबाळकर, शिक्षक नेते गुरुनाथ वांगीकर आदी होते.

बातम्या आणखी आहेत...