आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील चार स्थानकांवरून धावणार ‘तेजस सेमी हायस्पीड’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- बहुप्रतीक्षित व बहुचर्चित ‘तेजस सेमी हायस्पीड’ ही रेल्वे वर्षाच्या अखेरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत रुजू होण्याची शक्यता आहे. कपूरथळा (पंजाब) येथील रेल्वे डबे निर्मिती कारखान्यात या रेल्वेची वेगाने निर्मिती केली जात अाहे. सुरुवातीला देशातील नऊ मार्गांवरून तेजस धावणार असून त्यात महाराष्ट्रातील तीन स्थानकांचा समावेश अाहे. सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या या रेल्वेचा ताशी १३० किमी वेग हेही एक अाकर्षण असेल.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्पात तीन नव्या गाड्यांची घोषणा केली होती. त्यातील एक तेजस. नावाप्रमाणेच ती वेगवान असेल. देशात धावणाऱ्या राजधानी व शताब्दी एक्स्प्रेसच्या ५० ते ६० टक्क्यांहून अधिक वेग तिचा असेल. प्रवाशांना जणू अापण विमानातूनच प्रवास करत असल्याचा अनुभव येईल, अशा सुविधा या गाडीत असतील. कपूरथळ्यातील कारखान्यात सध्या चार डब्यांची निर्मिती झाली आहे. पहिल्या टप्प्यात २० डबे बनवले जातील. यात १४ एसी चेअर कार, ३ एक्झिक्युटिव्ह डबे व ३ पॉवर कारचा समावेश आहे, अशी माहिती कारखान्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी वीरेंद्रकुमार वीज यांनी दिली.
गाडीतील सुविधा
तेजस रेल्वेच्या डब्यात प्रत्येक सीटच्या पाठीमागे छोटासा टीव्ही, एलसीडी बोर्ड, चहा व काॅफी व्हेंडिंग मशीन, मोफत वायफाय सुविधा, सीसीटीव्ही कॅमरे, डिजिटल डेस्टिनेशन बोर्ड, इलेक्ट्रॉनिक प्रवासी आरक्षित तक्ता, स्वच्छतागृहातील पाण्याची पातळी दाखवणारे बोर्ड, स्वच्छतागृहात व्हॅक्युम प्रेशरचा वापर, प्रवासात मासिके, अंधांसाठी ब्रेल लिपीतील सीट क्रमांक असेल.
हे असतील ९ मार्ग
दिल्ली -आग्रा, दिल्ली -कानपूर, दिल्ली -चंदिगड, मुंबई -गोवा, नागपूर -सिकंदराबाद, मुंबई -अहमदाबाद, चेन्नई -हैदराबाद, म्हैसूर -बंगळुरू- चेन्नई, नागपूर -बिलासपूर या मार्गांवरून प्रायाेगिक तत्त्वावर तेजस रेेल्वे धावेल. त्याचा प्रतिसाद पाहून नंतर अन्य मार्गांवर सुुरू केली जाईल, अशी माहिती रेल्वे बाेर्डाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार सक्सेना यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...