आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूर : उष्माघाताने अपसिंगा येथील तरुणाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - तालुक्यातील आपसिंगा येथे बुधवारी (दि.२६) उष्माघाताने तरुणाचा मृत्यू झाला आहे. भर उन्हात क्रिकेट खेळत असताना ओंकार दत्तात्रय आंबुसे (१९) चक्कर येऊन कोसळला. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलविले, परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले. 
 
उस्मानाबाद येथील के. टी. पाटील डीफार्मसी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकणारा ओंकार आंबुसे बुधवारी दुपारी मित्रांसोबत अपसिंगा येथील नरेंद्र आर्य विद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळत असताना अचानक चक्कर येऊन जागीच कोसळला. त्यास तातडीने तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी अाकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...