आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: महापालिका निवडणूक; उमेदवारांमध्ये उत्कंठा, हुरहूर, निराशा अन् जल्लोष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामवाडी गोदामाकडे जाणाऱ्या रस्त्यावर निकाल ऐकण्यासाठी उमेदवार, कार्यकर्ते नागरिकांनी तुडूंब गर्दी केली होती. - Divya Marathi
रामवाडी गोदामाकडे जाणाऱ्या रस्त्यावर निकाल ऐकण्यासाठी उमेदवार, कार्यकर्ते नागरिकांनी तुडूंब गर्दी केली होती.
सोलापूर - यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये समोर आलेले निकाल अनपेक्षित, अनाकलनीय सर्वांनाच चकीत करून गेले. धक्का देणारे निकाल पाहून मोठ्या अपेक्षेने आलेले कार्यकर्ते सैरभैर झालेले दिसून आले. अपेक्षाच नसणाऱ्या कार्यकर्त्यांवर मात्र जल्लोषाची वेळ आली. त्यामुळे पहिल्या निकालापासून उत्कंठा, हुरहूर, कोठे निराशा तर कुठे जल्लोष असे वातावरण शासकीय गोदामस्थळी होते. 
 
सकाळी आठ वाजल्यापासून रामवाडी गोदाम येथे मत मोजणीसाठी लगबग सुरू झाली. पोलिस प्रत्येक प्रतिनिधींची तपासणी करूनच आत सोडत होते. दहा वाजता मतमाेजणीस प्रारंभ होण्याची वेळ होती. मात्र तांत्रिक कामांमुळे १० वाजून १० मिनिटांनी मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीच्या मतमोजणीसाठी १, ४, ६, ८, ९, १२, १६, १९ आणि २२ हे प्रभाग निवडण्यात आले. आरओकडे मतमोजणी करण्यात आली. आरओ क्रमांक वगळता सर्वच आरओमध्ये तीन प्रभागातील मतांची माेजणीची व्यवस्था करण्यात आली होती.
 
मतमोजणीसाठी १५ टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. तर पोस्टल मतांच्या मोजणीसाठी एक टेबल असे मिळून १६ टेबलवरून मत मोजणीस प्रारंभ झाला. १० वाजून ४५ मिनिटांनी पहिली फेरी जाहीर झाली. सकाळी ११ वाजता प्रभाग क्रमांक चा. प्रभाग मधून भाजपच्या चारही उमेदवारांचे पॅनल विजयी झाल्याचे कळाल्यानंतर समर्थकांनी जल्लोष केला. भाजपच्या पहिल्या विजयाची बातमी प्रभाग क्रमांक मधून आली. तर सेनेचे खाते प्रभाग १९ मधील गुरुशांत धुत्तरगावकर यांनी उघडले. त्यानंतर एकापोठाेपाठ निकाल जाहीर होत गेले. शेवटचा निकाल प्रभाग क्रमांक १७ चा लागला. 
 
सात खेळाडू नगरसेवक 
प्रभाग नऊ मधून भाजपकडून निवडून आलेले नागेश वल्याळ अविनाश बोमड्याल हे क्रिकेटपटू आहेत. वल्याळ यांची फेरनिवड झाली आहे. या दोघांनी आंतरमहाविद्यालयीन आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 
 
राज्य पातळीवरील खो-खोपटू चेतन नरोटे यांचीसुद्धा परत प्रभाग १५ मधून काँग्रेस पक्षाकडून वर्णी लागली आहे. याच प्रभागातून क्रीडा संघटक सीए विनोद भोसले हे काँग्रेसकडून निवडून आले आहेत. ते राज्य पेंट्याक्यू संघटनेचे अध्यक्ष आहेत. योगाचा प्रचार प्रसार करणाऱ्या संगीता जाधव या प्रभाग २४ मधून निवडून आल्या आहेत. 
 
पोस्टल मतांमुळे उशीर 
यंत्रणा जरी अद्ययावत असली तरी निकाल हाती येण्यास ४० ते ५० मिनिटांचा अवधी लागत. ईव्हीएम मशिनची मोजणी झाल्यानंतर पोस्टल मतांची मोजणी सुरू होत. प्रभाग क्रमांक मतमोजणी सुरू असताना पोस्टल मतांच्या मोजणीस विलंब लागल्याने पुढच्या फेरीच्या मोजणीसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना ३० ते ४० मिनिटे वाट पाहत बसावे लागले. 
 
पोलिस दमनशाही विरुद्ध छायाचित्रकारांचे आंदोलन 
विजयी उमेदवारांचे फोटो घेण्यापासून घायाचित्रकारांना रोखण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी एका दैनिकाच्या छायाचित्रकाराची कॉलर पकडली. छायाचित्रकार आणि पोलिस यांच्यात यावरून वाद निर्माण झाला. छायाचित्रकारांच्या मदतीला पत्रकार धावून गेले. दोघांनी मिळून पोलिसांच्या विरोधात नारा देत धरणे आंदोलन केले. प्रकरण वाढल्यानंतर पोलिस उपायुक्त नामदेव चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन या प्रकरणावर तोडगा काढला. नंतर मात्र पोलिसांनी मैत्रीचा हात पुढे करत त्या छायाचित्रकारांसाठी भोजनाची व्यवस्था केली. 
 
उमेदवारांना फुटला घाम 
यंदाच्या मतमोजणीवेळी आयुक्तांनी नियोजनात बदल केला. याचा चांगलाच फटका उमेदवारांना बसला. मतमोजणी कक्षाच्या पाठीमागच्या बाजूस उमेदवार होते. उन्हाची तीव्रता सकाळपासूनच जाणवत असल्याने अनेक उमेदवार उन्हातच घाम पुसत उभे होते. त्यांना बसण्यासाठी साध्या खुर्चीचीदेखील व्यवस्था करण्यात आली नव्हती. जेव्हा उमेदवारांना ऊन सोसवेना त्यांनी सावलीचा अासरा शोधत जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी बसण्यास सुरुवात केली. तर काहीनी पिण्याच्या पाण्याच्या पाऊचसाठी ठेवलेल्या टेबलवरून पाऊचचे पोते खाली ठेवून त्या ठिकाणी बसकन मारली. महिला उमेदवारांनी मात्र तिथे मारलेल्या छोट्या मंडपाखाली अासरा घेणे पसंत केले. 
 
चर्चा फक्त प्रभाग सातची 
मातब्बरनेते प्रभाग क्रमांक सातमधून उभे होते. त्यामुळे पहिल्यापासूनच हा प्रभाग सोलापुरातला सर्वात अधिक चर्चेत राहिला आहे. सर्वांना उत्सुकता प्रभाग सातची होती. संवेदनशील प्रभाग असल्याने उशिराने या प्रभागाची मतमोजणी सुरू होईल, असे सांगितले जात होते. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास प्रभाग सातच्या मतमोजणीस अखेर सुरुवात झाली. थोड्या वेळात निकालदेखील स्पष्ट झाला. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा ,ज्येष्ठ नेत्यांनी मतदान केलेल्या प्रभागात विरोधक... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...