आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारमंत्र्यांचा दावा खोटा; बँकांमधून नव्याने कर्ज नाही, तत्वत: निकषपात्रचा घोळ अद्याप उलगडेना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
उस्मानाबाद- कर्जमाफीची घोषणा करताना कर्जमाफीला ‘तत्वत:’ मंजुरी देण्यात आली आहे. तसेच ‘निकषपात्र’ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, कर्जमाफीचा घोळ अद्यापही उलगडलेला नाही. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी बँका सोमवारपासून कर्ज वाटप करणार असल्याचा दावा केला होता. मात्र, मंगळवारीही हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. 
 
राज्यात शेतकरी नेते शरद जोशी यांनी १९८० मध्ये केलेल्या शेतकरी आंदोलनानंतर यावेळी अभूतपूर्व शेतकरी आंदोलन करण्यात आले. याचा परिपाक म्हणून शासनाला कर्जमाफीची घोषणा करावी लागली. शेतकऱ्यांनी यामुळे सर्वत्र जल्लोष केला. तसेच भाजपनेही साखर, पेढे वाटून आनंद व्यक्त केला. जल्लोषादरम्यान फोडलेल्या फटाक्यांच्या अवशेषांचाही चुराडा झाला तसेच साखर पेढ्याची गोडीही कमी झाली. मात्र, अद्यापही कर्जमाफीबाबतचा संभ्रम दूर झालेला नाही. तत्वत: निकषपात्र या शब्दांच्या अर्थाचा अंदाज सर्वजण बांधत आहे. दोन्ही शब्दात आपले कर्ज माफ व्हावे, याची सर्वांना अपेक्षा आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारपासूनच नव्याने कर्ज वाटप करण्यास सुरुवात करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात केली होती. मात्र, मंगळवारीही त्यांच्या घोषणेप्रमाणे कर्ज वाटप होऊ शकलेले नाही. अगोदर कर्ज असलेल्या शेतकऱ्याला पुन्हा नव्याने कर्ज देण्यात आल्याचे उदाहरण जिल्ह्यात एकाही ठिकाणी घडलेले नाही. प्रत्येक शेतकरी बँकेमध्ये जाऊन याबाबत विचारणा करत होते. मात्र, बँकेतील कर्मचारी त्यांच्याकडे पाहतही नव्हते. यामुळे शेतकरी पुन्हा तसेच बाहेर येत होते. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तसेच सहकारी मंत्री देशमुख यांचा दावा खोटा असल्याची भावना निर्माण होत आहे. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परिस्थिती अगोदरच खालावलेली आहे. यामुळे कर्जमाझी झाली तरी येथून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा ही बँक कर्ज देण्याची शाश्वती कमीच आहे. कर्जमाफीमुळे बँकेची वसुली आपोआप झाल्यासारखी होणार आहे. यातूनच बँक अडलेल्या ठेवीदारांना मदत देण्याची शक्यता आहे. बँकेने १९२ कोटी कर्ज वाटप केले आहे. तर ४८० कोटींच्या ठेवींच्या रकमेची मागणी बँकेकडे होत आहे.
 
पत्राची प्रतीक्षा : राष्ट्रीयीकृत जिल्हा बँकेतून एक लाख ८८ हजार ५६१ शेतकऱ्यांनी पीक मुदतफेडीचे मिळून १४४९ कोटी ५७ लाख कर्ज घेतले. मात्र, यातील किती कर्ज माफ होईल, याबाबत कोणालाच काही सांगता येत नाही. शासनाकडून बँकेला अधिकृत अध्यादेश प्राप्त होईपर्यंत याबाबतचे चित्र स्पष्ट होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...