आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणीसाठी बार्शीतील प्राध्यापक अपहरण प्रकरणात तिघांना अटक; म्हाेरक्या फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
सोलापूर - बार्शी येथील खासगी क्लासेस घेणारे प्रा. मधुकर गणपत डोईफोडे (वय ४९)  यांचे अपहरण करून पंचवीस लाखाची खंडणी मागत परंडा रस्त्यावरील वारदवाडी फाटयजावळ सोडून दिले होते. याप्रकरणात ग्रामीण पोलिसांनी सोमवारी तिघांना अटक केली अाहे. अाराेपींचा मुख्य उद्देश खंडणी मागण्याचा अाहे. अजून संशयितांकडे चौकशी सुरू असून अाणखी काही वेगळा उद्देश होता का याची माहिती घेत अाहोत असे पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी सांगितले.  
 
रामा राजेंद्र साडेकर (वय २४, रा. माळीगल्ली, परंडा, उस्मानाबाद), सोमनाथ रामलिंग भोसले (वय ३०, रा. चिंचगाव, माढा, सोलापूर), अण्णासाहेब रामचंद्र राऊत (वय ३५, रा. म्हैसगाव, माढा) अशी अाराेपींची नावे अाहेत. विलास नरहरी उबाळे (रा. म्हैसगाव, माढा) हा मुख्य सूत्रधार असून ताे फरार अाहे. या गुन्हयात वापरलेली स्कापीॅअोचाही शोध लागला नाही. दोन दिवसात पूर्ण घटनेचा उलगडा होईल, असे प्रभू म्हणाले. 
 
२५ लाख केव्हा कुठे द्यायचे हे पुन्हा सांगू 
डोईफोडे हे अनेक वर्षापासून शिकवणी घेतात. ११ मे रोजी सकाळी ६ वाजता माॅनिॅग वाॅकला जाताना त्यांना चौघांनी मिळून स्कापीॅअोतून पळवून नेले. काही अंतरावर गेल्यानंतर धमकावण्यास सुरूवात झाली. ‘अाम्हाला २५ लाख रूपये पाहिजे. ते पैसे कुठे, केव्हा अाणून द्यायचे याची माहिती अापणास फोनवरून दिली जाईल,’ अशी बतावणी करीत परंडा रस्त्यावरील वारदवाडीजवळ त्यांना  सोडून दिले हाेते. सुटका झाल्यानंतर नातेवाईक व पोलिसांना घटनेची माहिती दिली हाेती. अपहरणकर्ते अाज बाशीॅ परिसरात तिघेजण येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाेलिसांनी त्यांना जेरबंद केले. उबाळेला अटक झाल्यानंतर खरी माहिती उजेडात येईल, तोच सूत्रधार अाहे. अन् पोलिस रेकाॅर्डवर असल्याचे  प्रभू म्हणाले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...