आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: पोलिस असल्याची बतावणी करून दोन घटनांत सात तोळे सोन्याचे दागिने लंपास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अाम्ही पोलिस अाहोत, दागिने काढून ठेवण्यास सांगत चोरांनी दोन घटनांमध्ये सात तोळे दागिने पळवले. या दोन्ही घटना शुक्रवारी दुपारी ११ ते १२ या दरम्यान कन्ना चौक रेवणसिद्धेश्वर मंदिराला दर्शनासाठी जाताना घडल्या अाहे. महाशिवरात्रनिमित्त मंदिर परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन चोरांनी अापला डाव साधला. 
 
पहिल्या घटनेत शैलजा श्रीहरी बुरगूल (रा. राजेंद्र चौक) यांनी जेल रोड पोलिसात तक्रार दिली अाहे. त्यांच्याजवळील पाच तोळ्यांच्या बांगड्या गंठण नेण्यात अाले अाहे. श्रीमती शैलजा या हिंगुलांबिका मंदिराजवळून पायी जात होत्या. त्यावेळी दोघे तरुण जवळ अाले. अाम्ही पोलिस अाहोत असे असे सांगत पुढे खून झाला अाहे. दागिने काढून ठेवा म्हणून दागिने काढून घेतले. रूमालात बांधण्याचा बहाणा करून दागिने घेऊन पळून गेल्याचे तक्रारीत म्हटले अाहे. फौजदार दांडगे तपास करीत अाहेत. 
 
दुसऱ्या घटनेत मीना बळवंत कुलकर्णी (रा. जवाहर सोसायटी, कुमठा नाकाजवळ) यांनी सदर बझार पोलिसांत तक्रार दिली अाहे. त्या पतीसह देवदर्शनासाठी रेवणसिद्धेश्वर मंदिरात जात होत्या. महिला हाॅस्पिटलजवळील राजेश मीनानगराजवळ अाल्यानंतर दोघे तरुण जवळ येऊन तुम्ही कालचा पेपर वाचला नाही का, अाम्ही पोलिस अाहोत, दागिने काढून ठेवा असे सांगत गळ्यातील गंठण काढून पतीच्या हातात दिले. तुमच्याही गळ्यातील लाॅकेट काढा, असे म्हणून गंठण लाॅकेट रूमालात बांधण्याचा बहाणा करून पळून गेल्याचे तक्रारीत म्हटले अाहे. 
 
सिंधू विहार काॅलनीत पाऊण लाखाची चोरी 
जुळे सोलापूर सिंधू विहार काॅलनीतील संतोषकुमार कुलकर्णी यांच्या घरात चोरी झाली. विजापूर नाका पोलिसात त्यांनी तक्रार दिली अाहे. घराचा कडीकोयंडा उचकटून बेडरूमधील कपाटातून सोन्याचे दागिने पैसे असा ७५ हजारांचा एेवज चोरीस गेल्याचे तक्रारीत म्हटले अाहे. ही घटना शनिवारी उघडकीस अाली. याशिवाय शिवाजी चौकातून २५ हजार किमतीचा बँजो चोरीला गेला अाहे. ही घटना १९ फेब्रुवारी रोजी घडली असून, शनिवारी फौजदार चावडी पोलिसात सिद्धेश्वर कांबळे (रा. जुना बोरामणी नाका) यांनी तक्रार दिली अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...