आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेशिस्त पार्किंग; तीर्थक्षेत्री पोलिसांची मोठी कसरत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर शहरातून संचलन करताना पोलिसांना मार्ग शोधावा लागत होता. - Divya Marathi
तुळजापूर शहरातून संचलन करताना पोलिसांना मार्ग शोधावा लागत होता.
तुळजापूर- तीर्थक्षेत्रतुळजापुरातील बेशिस्त पार्किंगचा फटका पोलिसांनाच शुक्रवारी (दि. ११) अनुभवण्यास आला. गणेशोत्सवानिमित्त सशस्त्र दलाचे शहरातून संचलन करताना वाहनांच्या गर्दीतून रस्ता शोधावा लागला, याची दिवसभर चर्चा होती.

तीर्थक्षेत्र तुळजापुरातील रस्त्यावरील बेशिस्त पार्किंगचा नागरिकांसह भाविकांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावून बेशिस्त पार्किंगला आळा घालण्यात पोलिसांचे नेहमीच दुर्लक्ष राहिले आहे. त्यामुळेच शुक्रवारी शहरात पोलिस दलाचे संचलन करताना पोलिसांना वाहनांच्या गर्दीतून रस्ता शोधताना होणारी दमछाक सर्वसामान्यांसाठी चर्चेचा विषय बनला. शहरातील भवानी रोड, घाटशीळ रोड, महाद्वार परिसर, कमानवेस, महाद्वार रोड, शुक्रवार पेठ या मार्गावर नेहमीच रस्त्यावर वाहने लावलेली असतात. रस्त्यावर लावलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार नित्याचेच असून, यातून अनेकदा बाचाबाची होऊन प्रकरण हातघाईवर येते. शहरातील बेशिस्त पार्किंगवर नाराजी व्यक्त करून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वत: शहरातील वाहने रस्त्यावरून काढली. परंतु, पोलिस खात्याकडून सहकार्य मिळत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनीही शेवटी हात टेकले. दरम्यान, बेशिस्त पार्किंगप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशावरून पालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची नामुष्की ओढवली. पोलिस निरीक्षक ज्ञानोबा मुंडे, सुभेदार सुनील दत्त यांच्या नेतृत्वाखाली २५ पोलिस कर्मचारी, अधिकारी, ८० सशस्त्र दलाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे संचलन झाले.